शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टरांप्रमाणे परिचारिकाही रुग्णांसाठी ‘देवदूत’; ‘तिच्या’मुळे रुग्णांच्या आयुष्याची दाेरी बळकट

By संतोष हिरेमठ | Updated: May 12, 2023 13:02 IST

नवजात शिशूंपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची कुटुंबीयांप्रमाणे काळजी घेते ‘सिस्टर’

छत्रपती संभाजीनगर : एखाद्याला हॉस्पिटलला भरती करण्याची वेळ आलीच तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच दवाखान्यात काळजी घेणारी व्यक्ती कोणी असेल तर त्या असतात नर्स’. अगदी एक दिवसाच्या शिशूपासून तर वृद्धाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी परिचारिका रात्रंदिवस झटत असतात. त्यामुळेच डाॅक्टरांप्रमाणे परिचारिकाही रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत.

दरवर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. नर्स, सिस्टर आणि परिचारिका म्हणून ‘तिची’ ओळख आहे. गेल्या काही वर्षांत नर्सिंगमध्ये पुरुषांची संख्याही वाढत आहे. शासकीय रुग्णालय असो की खाजगी, प्रत्येक रुग्णाच्या वेदनेवर परिचारिका मायेची फुंकर घालत आहेत.

‘गोल्डन अवर’मध्ये मदतहार्ट अटॅकच्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार, आवश्यक मदत आणि धीर देण्याचा नेहमीच प्रयत्न करते. आमच्या कामातून सेवा आणि वेतन या दोन्ही गोष्टी साध्य होतात.- अनुजा टेकाळे, परिचारिका

रुग्णाला सर्वप्रथम धीरउपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला सर्वात आधी धीर देणे महत्त्वाचे ठरते. ‘मला काय होईल’ याची चिंता रुग्णाला सतावत असते. ही चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.- सोनाली गायकवाड, परिचारिका

शिशू बरे होतात, हे समाधान देणारेवजन कमी आणि गुंतागुंतीमुळे अनेक नवजात शिशू ‘एनआयसीयू’त दाखल होतात. त्यांची सतत काळजी घेत असतो. अतिशय कमी वजनाची शिशूही बरी होऊन जातात, याचे मोठे समाधान आहे.- जिजिता पुष्करण, एनआयसीयू नर्स

...तेव्हा नातेवाईक आशीर्वाद देतातनवजात शिशूंवर उपचार करताना सतत लक्ष ठेवावे लागते. कोणाला तरी आमच्या रुग्णसेवेमुळे मातृत्वाचा आनंद मिळतो, ही आनंददायी वाटते. शिशू बरा होऊ जातो, तेव्हा नातेवाईक आशीर्वाद देतात.- शेख हमीदा, बालरुग्ण परिसेविका

४० टक्के पुरुष नर्सरुग्णसेवा करताना ३० वर्षे झाली आहे. रुग्णसेवेत महिला, पुरुष असा भेदभाव केला जात नाही. परिचारिका आणि ब्रदर हे दोघेही रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटत असतात. गेल्या काही वर्षांत पुरुष नर्स म्हणजे ब्रदरची संख्या वाढली आहे. घाटीत जवळपास ४० टक्के पुरुष नर्स आहेत.- नाथा चव्हाण, इन्चार्ज ब्रदर

परिचारिकांच्या अन्य महाविद्यालयांत बदल्या नकोघाटीत परिचारिकांच्या एका वार्डातून दुसऱ्या वार्डात बदल्या होत असतात. परंतु आता अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत बदल्या होत आहेत. अशा प्रकारे बदल्या होता कामा नये. परिचारिका अहोरात्र रुग्णसेवा देतात. रुग्णांच्या औषधोपचारासाठी आवश्यक साहित्य वेळच्या वेळी उपलब्ध करून दिले पाहिजे.- इंदूमती थोरात, सचिव, गर्व्हमेंट नर्सेस फेडरेशन

परिचारिका प्रशासकीय पदावरहीअलीकडे परिचारिका या प्रशासकीय पदावरही काम करीत आहे. परिचारिका म्हणजे महिलांचेच क्षेत्र समजले जायचे, मात्र आता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मुले या क्षेत्रामध्ये प्रवेश घेत आहेत. त्याचे कारण या क्षेत्रात जॉब सेक्युरिटी आहे आणि परदेशातसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत.- अनुसया सावरगावे - भोसले, सदस्य, महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई (मराठवाडा विभाग)

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद