सोयगाव : आदिवासी काळदरी ते खैरवाडी हा रस्ता सांडव्याच्या पाण्यात बुडाल्याने काळदरीच्या ग्रामस्थांना कंबरभर पाण्यातून जीवघेणा मार्ग काढावा लागत आहे. येथील नागरिकांना मूलभूत सुविधा तर दूरच ; परंतु दळणवळणासाठी पायी रस्ताही मिळत नसल्याने प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी काळदरी गावाला आधीच शासकीय सुविधांचा अभाव आहे. येथे जाण्यासाठी धड रस्ताही नाही. ग्रामस्थांची एकमेव असलेली पाउलवाट धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे एकमेकांचा हात धरीत ग्रामस्थांना या जलमार्गातून जावे लागते. येथे रस्ता बनविण्याची मागणी गावातील गोपीनाथ मधे, शंकर गिऱ्हे, धनजी गांगड, लक्ष्मण गिऱ्हे, रावजी मधे, भाऊ गांगड आदींनी केली आहे.
फोटो : धरणाच्या सांडव्यातील कंबरभर पाण्यातून जाताना काळदरीचे ग्रामस्थ.
220921\img-20210922-wa0134.jpg~220921\img-20210922-wa0137.jpg
सोयगाव-धरणाच्या सांडव्यातून जातांना ग्रामस्थ~सोयगाव-रास्तच नसल्याने एकमेकांकगे हात धरून जातांना आदिवासी