शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

छत्रपती संभाजीनगरात एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर उभारणार: भागवत कराड 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 22, 2023 13:11 IST

महामेळाव्यात एलआयसीच्या ५०० एजंटांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर : शहरात ‘एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर’ सुरू करणार असल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांना जीवन विमा कवच देणाऱ्या नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या मेळाव्यात एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, व्यवस्थापकीय संचालक एम. जगन्नाथ, विभागीय व्यवस्थापक कमल कुमार, मार्केटिंग व्यवस्थापक अरविंद शिंधू, संजय रामधेर यांची प्रमुख उपस्थिती होती. वंदे मातरम् सभागृह एलआयसी एजंटांनी खचाखच भरून गेले होते. संपूर्ण मराठवाडा, नगर जिल्ह्यांतून एजंट आले होते.

कराड म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर असून ती तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात चांगले काम होणे अपेक्षित आहे. मराठवाड्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाने व्याप्ती वाढवावी. ज्या ठिकाणी एलआयसीच्या मालकीच्या इमारती नाहीत, तिथे इमारती उभ्या करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे कराड यांनी सांगितले. चांगले काम करणाऱ्या ५०० पेक्षा अधिक एजंट, विकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेड, अमरावती, पुणे, नाशिक मंडळातील एजंट, विकास अधिकारी, एलआयसीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ऑल इंडिया लिआफीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ग्राहकांच्या गरजेनुसार एलआयसी योजना राबविणारएलआयसीच्या विविध योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यावर आपला भर असणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित विविध योजना, डिजिटल व्यवहार, दर्जेदार सेवा, कागदविरहित कामकाज व ग्राहकांच्या गरजेप्रमाणे योजना राबविण्यासाठी एलआयसीच्या कामकाजात सर्वाेच्च प्राधान्य देत आहोत.- सिद्धार्थ मोहंती, अध्यक्ष, एलआयसी

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीAurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवत