शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी धामच्या दरबारात १६ जणांच्या लिहिल्या चिठ्ठ्या; महाराजांनी ‘माइक’ बंद करून सांगितले...

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 8, 2023 12:47 IST

भाविकांमधून बोलावले तरुणीला; सांगितले, एक जण तुझी बदनामी करतोय

छत्रपती संभाजीनगर : पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी दुसऱ्या रांगेतील एका तरुणीला बोलावले... ती धर्मपीठावर येण्याआधीच तिची चिठ्ठी लिहून ठेवली होती... तिला सांगितले की, तुला एक जण बदनाम करीत आहे.’ हे ऐकून त्या तरुणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एक तरुणाला बोलावून ... तुझे पहिले लग्न मोडले, आता दुसरे लग्न कोणत्या तारखेला होईल व त्याच्या भावी पत्नीचे नाव काय आहे हेही जाहीर केले.... अशा १६ जणांच्या चिठ्ठ्या महाराजांनी लिहिल्या... महाराज सर्वांच्या ‘मन की बात’ ते कशी ओळखतात हे पाहून अनेक जण भारावले.

सकल हिंदू जनजागरण समितीकडून आयोजित व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड निमंत्रित पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धी प्राप्तीचा दावा करणाऱ्या महाराजांबद्दल मोठी उत्सुकता जनमानसात आहे. त्यांच्या ‘बालाजी धाम सरकार’चा भव्य दरबार मंगळवारी भरविण्यात आला.

दरबारात चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात होताच शिवम नावाच्या व्यक्तीला महाराजांनी आवाज दिला. त्याची समस्या व त्यावर उपाय लिहून दिला. नंतर पगडीधारी पिळदार मिशा असलेल्या वृद्धाची चिठ्ठी निघाली. त्यांच्या घरात मुलांमध्ये सुरू असलेला विवाद व त्यावर उपाय महाराजांनी सांगितला.

पाठीमागे गळ्यात दुपट्टा घातलेल्या तरुणाचे नाव पुकारले. तो धर्मपीठावर येताच त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे, हे सांगितले, तेव्हा तो चकित झाला. काही दाम्पत्यांना बोलावून त्यांचे दुखणे काय, हे सांगितले तर ‘माइक’ बंद करून काही जणांना खासगीत सल्ला दिला. यावेळी मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, हर्षवर्धन कराड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महावीर पाटणी, शीख समाज, सिंधी समाजाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

चमत्कार, अंधश्रद्धा नव्हे सिद्धीप्राप्ती...महाराजांनी सांगितले की, हा चमत्कार, अंधश्रद्धा नाही, सनातन धर्मात अशा सिद्धी आहेत, त्या मी तपस्येतून प्राप्त केल्या आहेत.

वाल्मीकी ऋषींनी आधी ‘रामायण’ लिहून ठेवलेरावणाचा नाश करण्यासाठी श्रीराम अवतार घेईल, हे वाल्मीकी ऋषींनी आधीच ‘रामायणा’त लिहून ठेवले होते. माझ्या आजोबांचे गुरू, नंतर आजोबांनी असे दरबार भरविले होते. आता मी भरवत आहे, असे महाराजांनी सांगितले.

पुन्हा जानेवारीत दरबारमहाराजांनी सागितले की, मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरात येईन. ६ ते ८ जानेवारी २०२४ ला दरबार भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आज समारोपबुधवारी कथेचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३.३० वाजता हनुमान कथेला सुरुवात होऊन सायंकाळी समारोप होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbageshwar dhamबागेश्वर धाम