शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

एनएच २११ भूसंपादन प्रकरणात विभागीय चौकशी करण्याचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:08 IST

Aurangabad News आयुक्त केंद्रेकेर यांनी अहवालाच्या निष्कर्षाअंती या प्रकरणात विभागीय चौकशी करण्याची गरज असल्याचा अभिप्राय नोंदविणारे पत्र शासनाला पाठविले होते.

ठळक मुद्देतत्कालीन एसडीएम हदगल यांच्यासह यंत्रणेवर संशयचौकशीअंती अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता

औरंगाबाद : सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ साठी जिल्ह्यातील ८ गावांतील १३ गटांतील भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयप्रकरणी शासनाने तत्कालीन उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची विभागीय चौकशी करण्याचे पत्र विभागीय प्रशासनाला दिल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. हदगल यांच्यासह भूसंपादन प्रक्रियेत असलेली सर्व यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली असून, आगामी काळात चौकशीअंती अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ज्यांच्या जमिनी एनएच २११ साठी संपादित झाल्या त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. त्या चौकशी समितीमध्ये अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, तत्कालीन उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त पुरुषोत्तम पाटोदेकर यांचा समावेश होता. सदरील समितीने गेल्या महिन्यात तक्रारींच्या अनुषंगाने पूर्ण शहानिशा करीत अहवाल विभागीय आयुक्तांना दिला होता. आयुक्त केंद्रेकेर यांनी अहवालाच्या निष्कर्षाअंती या प्रकरणात विभागीय चौकशी करण्याची गरज असल्याचा अभिप्राय नोंदविणारे पत्र शासनाला पाठविले होते. त्या अनुषंगाने शासनाने या प्रकरणात हदगल यांची विभागीय चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. या चौकशीत हदगल यांचे म्हणणेदेखील ऐकले जाईल. तसेच नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (एनएचएआय) म्हणणे ऐकले  जाईल. 

चौकशी समितीचा ठपकात्रिसदस्यीय चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी करताना १९ जमीनमालकांना दिलेल्या मावेजाबाबत माहिती संकलित केली. त्या भूसंपादनात ४१ कोटी रुपयांचा जास्तीचा मोबदला दिल्याचा निष्कर्ष नोंदविला. तिथे ५ कोटींच्या आसपास  रक्कम देणे अपेक्षित होते, असे समितीचे मत आहे. आठ गावांतील १३ गटांमधील जमिनी हायवेलगत दाखवून प्रतिचौरस मीटरमध्ये नगररचना विभागाने निर्धारित केलेला दर वाढवून जास्तीची रक्कम दिल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष आहे. याव्यतिरिक्त समितीने आणखी काही मुद्दे मांडले आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयfraudधोकेबाजी