शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

'चला, ५५० रुपयांत पुण्यात'; प्रवाशांची पळवापळवी, बसस्थानकाच्या जोरावर एजंटांची दिवाळी

By संतोष हिरेमठ | Updated: November 14, 2023 11:40 IST

सुरक्षारक्षक नावालाच; मध्यवर्ती बसस्थानकात चौकशी कक्षासमोरच उभे राहून एजंटांकडून प्रवाशांची पळवापळवी सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘साहेब, फक्त ५५० रुपये द्या. चारचाकीत बसा आणि साडेतीन तासांत पुण्यात पोहोचा. वाटले तर एसी कारही मिळेल,’ असे म्हणत खासगी वाहतूकदारांच्या एजंटांकडून बसस्थानकात घुसून ‘एसटी’च्या प्रवाशांची पळवापळवी सुरू आहे. बसस्थानकातील सुरक्षारक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले.

दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने सध्या मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक भरून जात आहे. एखादी बस येत नाही तोच काही मिनिटांत भरून जात आहे. बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना काहीसे ताटकळावे लागते. याच परिस्थितीची संधी साधून खासगी वाहतूकदारांचे एजंट एसटीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना बसस्थानकाबाहेर नेण्याचा ‘उद्योग’ करीत आहेत.

गस्त, तरीही...‘पुना है क्या’, ‘नाशिक है क्या’, ‘चलो जळगाव,’ असे म्हणत एजंट प्रवाशांच्या मागे फिरत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षारक्षक गस्त घालतात. मात्र, अगदी त्यांच्या नजरेसमोर प्रवाशांना पळविण्याची किमया एजंट करीत आहेत. सुरक्षारक्षक केवळ नावालाच गस्त घालत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

२०० मीटरचा नियम कागदावरचबसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने नसावीत, असा नियम आहे. तरीही खासगी वाहने बसस्थानक परिसरात आणून बिनधास्तपणे प्रवासी घेऊन जाण्याचा प्रकार सुरू आहे. बसस्थानकाच्या दुतर्फा एजंटांचे घोळके, चारचाकी वाहने दिसून येतात.

जबाबदारी निश्चित केली जाईलयाबाबत संबंधित आगारप्रमुख हे चौकशी करून जबाबदारी निश्चित करतील, असे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटी