शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

अशीही ‘आयडिया’; चला, चार्टरने चला...मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला !

By संतोष हिरेमठ | Updated: April 18, 2023 13:41 IST

मुंबईसाठी सायंकाळी विमानसेवा नसल्याचा परिणाम, लोकप्रतिनिधींनी घेतला चार्टरचा आधार

छत्रपती संभाजीनगर : कोणाला मुंबईहून सायंकाळी विमानाने छत्रपती संभाजीनगरला यायचे आहे का, चार्टर विमान जाणार आहे, अशी ‘आयडिया’ चार्टर विमानसेवा देणाऱ्या कंपन्या करीत आहे. एका मंत्र्यांसाठी मुंबईहून रविवारी रात्री रिकाम्या येणाऱ्या चार्टर विमानाने छत्रपती संभाजीनगरला येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांचा सोशल मीडियावरून शोध घेण्यात आला.

इंडिगोने काही दिवसांपूर्वीच सायंकाळची मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानसेवा बंद केली. त्यामुळे केवळ सकाळच्या वेळेतच मुंबई विमानसेवेचा पर्याय उरला आहे. सायंकाळी मुंबईसाठी विमानसेवाच नसल्याने प्रवाशांसह लोकप्रतिनिधींनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगरहून एका मंत्र्यांना रविवारी मुंबईला जाण्यासाठी चार्टर विमान घ्यावे लागले. हे चार्टर विमान मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला दाखल होणार होते. मंत्र्यांसाठी विमान मुंबईहून रिकामेच येणार होते. त्यामुळे मुंबईहून- छत्रपती संभाजीनगरसाठी सेवा उपलब्ध असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींकडून सामाजिक माध्यमांवर सांगण्यात आले. यानिमित्ताने सायंकाळच्या विमानसेवेसाठी चार्टर सेवेचाही पर्याय पुढे आल्याचे दिसते.

सात सीटर चार्टरचे भाडे किती?७ सीटर चार्टर विमानाचे एका तासासाठी जवळपास सव्वालाख ते दीड लाखांपर्यंत भाडे आकारण्यात येते. अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक सायंकाळी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला आणि शहरातून मुंबईला जाण्यासाठी चार्टर विमानाचा आधार घेत आहेत.

शहरात चार्टर कंपन्यांचे कार्यालयशहरात चार्टर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांचे कार्यालयदेखील आता पहायला मिळत आहे. चार्टर विमानाबरोबर हेलिकाॅप्टरचाही पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. तिरुपतीसाठीही चार्टर विमानाची विचारणा होत असल्याचे या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादairplaneविमान