शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:03 IST

खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे.

रऊफ शेखफुलंब्री : खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे. येथील २२ हजार शेतकºयांपैकी केवळ १,७५० शेतकºयांनी रबी पिकांसाठी विमा काढला असून, याला कारणीभूत यावर्षीचा दुष्काळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बळीराजाने विमा काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसानही त्यांचेच होणार आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केल आहे.तालुक्यात रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजारांवर आहे. यावर्षी विविध कारणांमुळे खरीप व रबी पिके धोक्यात आली व त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले. काही वेळा पिकांची नासाडी झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसला. मात्र, तरीही यावर्षी रबी पिकांच्या विम्याकडे बहुतांश शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पीक विमा भरण्यासाठी मोठी रक्कम लागत नाही. मात्र, पिकांचे नुकसान झाले, तर मदतीसाठी शासनाकडे मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकºयांनी विमा न काढणेच पसंत केले.जाणकारांच्या मते तालुक्यात गत काही वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत येथील शेतकºयांनी गतवर्षी काही प्रमाणात पीकविमा काढला होता; पण त्यातून पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. याच कारणामुळे त्यांनी विम्याकडे दुर्लक्ष केले. विशेष बाब म्हणजे विमा काढावा यासाठी शासनाने कृषी विभागाकडे जनजागृती करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी गावोगावी जाऊन पीक विमा संरक्षणाबाबत माहिती दिली. मात्र, त्याचा काहीही फायदा झालेला दिसून येत नाही. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही, बँकेत चकरा माराव्या लागतात, ठरवून देलेली रक्कम मिळत नाही. त्यामुळे विमा न काढणेच पसंत केल्याचे येथील बहुतांश शेतकºयांनी सांगितले.दरम्यान, तालुक्यात रबी पिकाचे क्षेत्र २९ हजार हेक्टर असून, यातील केवळ ८८९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला. त्यापैकी रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजार एवढी आहे. मात्र, २२ हजार शेतकºयांपैकी अवघ्या १,७५० शेतकºयांनी विमा काढला आहे, तर २० हजार शेतकºयांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली असून, ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला नाही, असे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, हे लक्षात असूनही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.पीक विमा भरण्यासाठी शेतकºयाला एकूण रकमेच्या केवळ पाच टक्केच रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून भरतात. त्यामुळे शेतकºयांवर फारसे ओझे पडत नाही. मात्र, असे असतानाही शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करतात. तालुक्यातील शेतकºयांनी रबी हंगाम २०१५-२०१६ मध्ये गहू व हरभºयासाठी विमा काढला होता. मात्र, नुकसान झालेले असताना त्यांना शेतकºयांच्या बियाणांचा खर्चही निघाला नाही. याच परिस्थितीचा अनुभव शेतकºयांना २०१६-२०१७ मध्ये आला होता. त्यामुळे दरवर्षी विमा काढणाºया शेतकºयांची संख्या घटताना दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी