करमाड: समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी जंक्शन जवळील जयपुर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने एक बिबट्या ठार झाला. सदर घटना ही रविवारी पहाटे उघडकीस आली.
१३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेला समृद्धी महामार्गावरील सुरक्षा रक्षकांना महामार्गावर मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क करून या घटनेबाबत बद्दल माहिती दिली. संभाजीनगर येथील वनविभागाच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला शिवविच्छेदनासाठी शेंद्रा एमआयडीसीला लागून असलेल्या वनविभागाच्या कुंभेफळ शिवारातील नर्सरी मध्ये हलविले.