शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेणीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला बिबट्या; वन विभागाने केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 19:16 IST

Leopard in Ajanta Caves : शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एक बिबट्या तिकीट बुकिंग ऑफिसजवळ असलेल्या मैदानात एका कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आला होता.

ठळक मुद्देअजिंठा वनपरिक्षेत्रात ८ ते १० बिबटे, गरज भासल्यास पकडणारपुरातत्व विभागाचे अधीक्षक डी. एस. दानवे यांचा पिंजरा लावण्यास नकार

अजिंठा : अजिंठा लेणीच्या पायथ्याला असलेल्या तिकीट बुकिंग ऑफिससमोर शनिवारी मध्यरात्री एक बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हे फुटेज व्हायरल झाल्याने लेणीत रात्रपाळी करणारे कर्मचारी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे कुणी एकटे दिवसा किंवा रात्री अजिंठा वनपरिक्षेत्रात व लेणीच्या डोंगरात फिरू नये असे आवाहन पुरातत्व विभागाचे अधीक्षक डी. एस. दानवे व अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांनी केले आहे.

अजिंठा लेणीत रात्री जवळपास १५ कर्मचारी लेणीची सुरक्षा करतात. हे कर्मचारी रात्री लेणीच्या ऑफिस व विविध ठिकाणी लेणीतील खोल्यांमध्ये काळजी घेऊन आश्रय घेतात. शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एक बिबट्या तिकीट बुकिंग ऑफिसजवळ असलेल्या मैदानात एका कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आला होता. मात्र, त्या कुत्र्याने धूम ठोकली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. तीन दिवसांपूर्वीसुद्धा एक बिबट्या पुरातत्व विभागाच्या जुन्या क्वॉर्टरजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पर्यटकांनी घाबरू नये, फक्त डोंगरात वावरताना काळजी घ्यावी, असे आवाहन अधीक्षक डी. एस. दानवे यांनी केले आहे.

पिंजरा लावण्यास नकार दरम्यान, अजिंठा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांनी लेणी परिसरात जाऊन तेथे वास्तव्यास असलेले कर्मचारी व पर्यटकांना काय सावधगिरी बाळगावी याबाबत जनजागृती केली. रात्री अपरात्री वन्यप्राणी आले तर काय काळजी घ्यावी याबाबत वनविभागाच्या वतीने लेणीत जनजागृती करण्यात आली. पुरातत्व विभागाचे अधीक्षक डी. एस. दानवे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी पिंजरा लावण्यास नकार दिला आहे यामुळे आम्ही तेथे पिंजरा लावला नाही अशी माहिती मांगदरे यांनी दिली.

अजिंठा वनपरिक्षेत्रात ८ ते १० बिबटेअजिंठा वनपरिक्षेत्रात जवळपास ८ ते १० बिबटे वास्तव्यास आहेत. मात्र, अजून कोणत्याही पर्यटकांवर त्यांनी हल्ला केलेला नाही. मात्र, पर्यटकांनी काळजी घ्यावी, डोंगरात एकटे जाऊ नये. बिबट्याने कुणावर हल्ला केला तर  किंवा पुरातत्व विभागाने सांगितले तर आम्ही लेणीत पिंजरा लावून त्या बिबट्याला पकडून अभय अरण्यात सोडू.- एस. पी. मांगदरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजिंठा

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforestजंगल