शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाचे दिवस फिरले! दर अचानक एवढे गडगडले की, शेतकरी गडबडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 15:27 IST

काही दिवसांपूर्वी लिंबाने देशभरातील नागरिकांना रडवले. लिंबाचे भाव 200-250 रुपये किलोपर्यंत झाले होते. पण, आता हळुहळू लिंबाचे भाव कमी होताना दिसत आहेत. 

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी लिंबाने देशभरातील नागरिकांना रडवले. लिंबाचे भाव 200-250 रुपये किलोपर्यंत झाले होते. पण, आता हळुहळू लिंबाचे भाव कमी होताना दिसत आहेत. औरंगाबाद शहरातील बाजार समितीमध्ये आज अचानक लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले. मार्च महिन्यात दोनशे रुपये किलो असलेला लिंबू आज अचानक 50-60 रुपये किलोवर आला आहे.

यासंदर्भात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी माहिती दिली की, परराज्यातून लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक बाजार समितीत झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील लिंबाच्या पिकाला मोठा फटका बसलाय. यासोबतच अचानकपणे वातावरणात झालेला बदल, वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस, याचा सुद्धा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून लिंबूला चांगली बाजारपेठ आणि चांगला भाव मिळाला होता यामध्ये शेतकऱ्यांना चांगली कमाई होत होती. मात्र अचानकपणे इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी औरंगाबाद बाजार समितीच्या बाजारपेठेमध्ये लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक केल्याने जिल्ह्यातील लिंबाचे भाव पडले आहेत. अशी प्रतिक्रिया काही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज रोजी दिली आहे. दरम्यान, या स्वस्त आणि महाग लिबांमध्ये फरकही पाहायला मिळत आहेत. काही लिंबू अनैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत, तर काही नैसर्गिक आहेत. त्यानुसार, लिंबांच्या दरांमध्ये फरकही दिसून येतोय.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद