शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून पाणी सोडा, अन्यथा औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:25 IST

पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका शेतात उभ्या असलेल्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडी धरणातूनपाणी सोडले नाही तर २१ मे रोजी जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय रविवारी पैठण येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून पैठण तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधारे कोरडे झाले आहेत. त्यातच पैठण ते हिरडपुरीदरम्यान गोदावरी पात्र आटले आहे. यामुळे गोदावरी पात्रातून ज्या गावांनी पाणीपुरवठा योजना केल्या आहेत, अशा गावात पाण्याचा ठणठणाट आहे. पैठण तालुक्यासह शेवगाव व गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदावरी पात्र, आपेगाव व हिरडपुरी बंधारे आटल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोदाकाठच्या गावात पाण्याच्या भरवशावर शेतात उभ्या असलेल्या अनेक वर्षांच्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत. वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. पाण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढली असून यातून शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने १३ ते १६ मे या दरम्यान पैठण व औरंगाबाद येथे जोरदार आंदोलन केले होते; मात्र केवळ तोंडी आश्वासनावर प्रशासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली होती. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जोगेश्वरी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आम्हाला पाणी नाही तर कुणालाच नाही, अशी टोकाची भूमिका घेत औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जयाजी सुर्यवंशी, हनुमान बेळगे, शरद गुंते, महादेव गोर्डे, वाघमोडे बाबा, शिवराज शिंदे, पवन औटे, सलीम पठाण, मकबूल पठाण, प्रशांत नरके, अशोक बनकर, दादासाहेब पवार, प्रदीप नरके, कृष्णा गहिरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन : आंदोलनातील सक्रिय चेहरे गायबआजच्या बैठकीसाठी नेहमी आंदोलनात सक्रिय असलेले चेहरे दिसून आले नाही. प्रत्यक्षात पाणीपुरवठा तोडण्यासाठी हे चेहरे नियुक्त असून प्रशासनासमोर त्यांना आणण्यात आले नाही. पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरी