शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नावाचे सोडा, दर्जेदार आरोग्य सेवांचे बोला! तीन वर्षांत दोनवेळा आरोग्य केंद्रांचे नामांतर

By विजय सरवदे | Updated: January 11, 2024 17:22 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये अडीचशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये ग्रामीण नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा वाढविण्याऐवजी शासनाकडून या आरोग्य केंद्रांच्या नामांतरावरच भर दिला जात आहे. तीन वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले. त्यानंतर आता या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे रूपांतर ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ असे केले जात आहे. दरम्यान, सातत्याने नावे बदलण्याऐवजी या केंद्रांद्वारे दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामीण नागरिकांची आहे.

तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २२१ उपकेंद्रांची नावे ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ अशी करण्यात आली होती. त्यानंतर या केंद्रांना ना भौतिक सुविधा मिळाल्या, ना आरोग्य सेवा अद्यावत झाल्या. आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नव्याने अस्तित्वात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांची नावे बदलूून ती ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ या नावाने ओळखली जावीत. या केंद्रांच्या पाट्या बदलण्याची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त निधीतून प्रति आरोग्य केंद्र ३ हजार रुपये याप्रमाणे खर्च केले जाणार आहेत. दरम्यान, रंगरंगोटी, प्रदर्शन व अन्य उपक्रमांसाठीचे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे जि. प. आरोग्य विभागामार्फत नव्याने निविदा प्रक्रिया हाती घेतली आहे. आतापर्यंत ६० ते ७० आरोग्य केंद्रांच्या पाट्या बदलण्यात आल्या असून, जानेवारी अखेरपर्यंत एकूण २७२ आरोग्यवर्धिनी केंद्रांची नावे बदलण्यात येणार आहेत.

दरम्यान, नावे बदलण्यापेक्षा या आरोग्य केंद्रांमध्ये प्रसुतीचे प्रमाण व बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णसेवेची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ग्रामीण नागरिकांना वाटते.

आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवाप्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये अडीचशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे. मध्यंतरी जि. प. भरती प्रक्रियेत या पदांचा समावेश होता. परंतु, ही भरती प्रक्रियाच आता न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे उपकेंद्रांची आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

आरोग्य केंद्रांतील सेवाप्रसुतीपूर्व व प्रसुती सेवा, नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, बाल्य व किशोरवयीन आजार, लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजारसंबंधी सेवा, दंत व मुखरोग आरोग्य सेवा, वाढत्या वयातील आजार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा आदी.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल