शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

उणिवांवर मात करायला शिका -इरा सिंघाल

By admin | Updated: April 25, 2016 00:44 IST

औरंगाबाद : आधी मी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होते. चांगले काम, उत्तम पगार असूनही त्या ठिकाणी मन रमले नाही. मला या व्यवस्थेत काही तरी बदल घडवायचा होता

औरंगाबाद : आधी मी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होते. चांगले काम, उत्तम पगार असूनही त्या ठिकाणी मन रमले नाही. मला या व्यवस्थेत काही तरी बदल घडवायचा होता. समाजासाठी काही तरी करायचे होते, त्याच पे्ररणेने २००९ साली मी नोकरी सोडली आणि आयएएस परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली, असे मत स्वत:च्या शारीरिक अपंगत्वावर मात करून अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या आयएएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इरा सिंघाल यांनी व्यक्त केले. एका खाजगी कार्यक्रमासाठी त्या शहरात आल्या असताना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी रविवारी मार्गदर्शन केले.लहानपणापासूनच ‘स्कोलियासिस’ या पाठीच्या कण्याशी निगडित आजारपणामुळे इरा यांना अपंगत्व आले व हाताच्या हालचालींवर मर्यादा आल्या. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळविली व एमबीएदेखील केले. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, माझ्यात काही तरी कमी आहे म्हणून कुढत बसणे मला मान्य नव्हते. मी परिस्थितीचा स्वीकार केला आणि त्यावर मात करण्याचे ठरविले. यासाठी मला माझ्या कुटुंबियांनी आणि मित्र-मैत्रिणींनी बळ दिले. कुठल्याही गोष्टीला न घाबरण्याचे संस्कार माझ्यावर लहानपणीच झाले. प्रत्येकाकडून काही तरी नवीन शिकत राहण्याचा माझा छंद आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, परीक्षा पद्धती तसेच शिक्षण पद्धतीला कायम दोष देत बसण्यापेक्षा स्वत:मधील उणिवांचा शोध घ्या, त्यावर मात करायला शिका आणि स्वत:च्या चुका शोधण्याची, त्या दुरुस्त करण्याची सवय लावा. कायम वास्तववादी राहण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थिताना दिला. स्पर्धा परीक्षा आणि खास करून यूपीएससीची तयारी कशी करावी यासंबंधी इरा यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. आयपीएस हरेश्वर स्वामी व भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत यश मिळविणारे गौरव रॉय यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.सकाळी ११ वा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात इरा सिंघाल विद्यार्थ्यांना भेटणार होत्या. परंतु प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींमुळे त्या तब्बल ४ तास उशिरा आल्या. अशा परिस्थितीतही शेकडो विद्यार्थी त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी उन्हातान्हात बसून होते. त्या मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क रताना इरा म्हणाल्या की, स्वत:ला प्रश्न विचारायची सवय लावा. इतरांच्या तुलनेत आपण महान आहोत, असा विचार डोक्यात येताच स्वत:ची तुलना विश्वाशी करा, आपण कुठे आहोत लगेच लक्षात येईल. तसेच एकाच क्षेत्रात अडकून न राहता करिअरच्या अनेक नव्या संधी कायम शोधत राहा, असे आवाहनही त्यांनी केले.