शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबशाहीतून नेते, कार्यकर्त्यांनी मुक्त व्हावे : प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:12 IST

कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची ही संधी

औरंगाबाद : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कुटुंबशाही आहे. त्यामुळे या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी बहुजन वंचित आघाडीत यावे. त्यांना योग्य सन्मान, पदे, उमेदवारीही देण्यात येईल. कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची ही संधी असल्याचे मत बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले.

बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन येथे शुक्रवारी रात्री वंचित आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी, आ. इम्तियाज जलील, आ. वारीस पठाण यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले की, आम्ही ४८ जागा का लढविल्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन जेव्हा उघडतील तेव्हा बघा... आज अंदाज लावणे कोणालाही सोपे जात नाही. ज्या उमेदवाराच्या जातीची मतेच नाहीत, त्यांनाही आम्ही उमेदवारी दिली. जात पाहून उमेदवारी देण्याचा फंडा ‘वंचित’मध्ये नाही. ‘वंचित’कडे पैसा आला कोठून, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. जनता जनार्दन मत, पैसा देऊन सभांना गर्दी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. एमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलेले जावेद कुरैशी यांना आज पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले.

साध्वी प्रज्ञा ठाकूरवर डागली तोफखा. असदोद्दीन ओवेसी यांनी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली. दहशतवादाच्या विरोधात मोदी लढत असलेली लढाई नाट्य असल्याचा आरोप त्यांनी केला. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वीने केलेल्या आरोपांचाही खरपूस समाचार  घेतला. शहीद करकरे यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची बंदी निवडणूक आयोगाने घातली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा बाबरच्या मुलांना मत देऊ नका, असे आवाहन केले. यावरही ओवेसींनी तोफ डागली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर