शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

‘एलबीटी’ माफ करता; मग कर्जमाफी का नको?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:37 IST

उस्मानाबाद : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे मुठभर लोकांसाठी काम करीत आहे. सत्तेवर येताच या सरकारने ‘एलबीटी’ माफ करून व्यापाऱ्यांना खुश केले.

उस्मानाबाद : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे मुठभर लोकांसाठी काम करीत आहे. सत्तेवर येताच या सरकारने ‘एलबीटी’ माफ करून व्यापाऱ्यांना खुश केले. विजय मल्ल्यासारखी मंडळी ९ हजार कोटी बुडवून परदेशात निघून जातात. दुसरीकडे तीन-चार वर्षांपासून सातत्याने भीषण दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास हे सरकार तयार नाही. हे कशाचे निदर्शक आहे. अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेना-भाजपाला शेतकरीविरोधी ठरविले. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने शनिवारी पवार यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, जीवनराव गोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्ष संपत डोके, तुळजापूर पालिकेच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजुषा मगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवदास कांबळे, जि.प.तील राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे आदींची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले की, वाट्टेल तसे आरोप करून आणि ‘अच्छे दिन आनेवाले है’, असे सांगत भाजप सत्तेत आली. परंतु, सरकारच्या दोन वर्षातील कार्यपद्धतीमुळे जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. दुष्काळातही शासनाचा भक्कम आधार मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित असल्याचे सांगत, सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत रझाकाराप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. चारा नसतानाही प्रशासनाच्या अहवालाचा हवाला देत छावण्या बंद करण्याचे आदेश काढले. परंतु, दुष्काळी भागातून पशुपालकांसह शेतकऱ्यांचा उठाव झाल्यानंतर शासनाने यु-टर्न घेतल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळत नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शरद पवार हे सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली. परंतु, भाजप सरकार कर्जमाफीचा फायदा बँकांना होत असल्याचे सांगत कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करीत आहे. विरोधकांनी ही मागणी लावून धरल्यानंतर ‘योग्यवेळी कर्जमाफी देऊ’ असे प्रत्येकवेळा सांगितले जाते. त्यामुळे या सरकारची ‘योग्य वेळ येणार कधी?’ असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी सरकारच्या ‘योग्य वेळे’ची वाट न बघता ‘सरकारलाच योग्य वेळी वाट (रस्ता) दाखवावी, अशी खोचक टिप्पनीही त्यांनी केली. दरम्यान, या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पवार यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, जीवनराव गोरे, आ. राहुल मोटे यांचीही भाषणे झाली.दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली होती. यापैकी उस्मानाबादसाठी साडेपाचशे कोटी मिळणार होते. तसा शासन आदेशही काढण्यात आला. परंतु, त्याची अंमलबजावणी शुन्य आहे. तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले आहे. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. असे असतानाही शासन ठोस पाऊले उचलीत नसल्याचा आरोप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला. दुष्काळ पाहणी करण्यासाठी पथके येतात अन् निघून जातात. मात्र, मदत काहीच मिळत नसल्याचेही ते म्हणाले. टंचाई निवारणार्थ टँकर, अधिग्रहणे करण्यात आली. परंतु, याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.