शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Advocates Protection Bill: सर्व वकील सोमवारी राहणार न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:53 IST

‘ॲडव्होकेटस् प्रोटेक्शन बिल’च्या मागणीसाठी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचा ठराव

छत्रपती संभाजीनगर : ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल’च्या मागणीसाठी राज्यातील उच्च न्यायालय, जिल्हा व तालुका न्यायालयातील सर्व वकिलांनी सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी ) एक दिवस न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने घेतला आहे.

नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यातील वकिलांनी उलट तपासणीमध्ये विचारलेल्या प्रश्नावर चिडून जाऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वकील परिषदेने २९ ऑक्टोबर २०२५च्या सर्वसाधारण सभेमध्ये सदर हल्ल्याचा तीव्र निषेध करून वकील वर्गाच्या आत्मसन्मान, सुरक्षा आणि वकील संघांच्या स्वातंत्र्यासाठी वरीलप्रमाणे ठराव पारीत केला आहे.

वकिलांवर अनेक हल्लेपत्रकात म्हटल्यानुसार गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात वकिलांवर विविध ठिकाणी हल्ले झाले आहेत. एवढेच नव्हे तर काही वकिलांना जिवास मुकावे लागले आहे. राहुरी येथील वकील दाम्पत्याचा निर्घृण खून झाला होता. याबाबतीत अनेक वकील संघांकडून निषेधाचे ठराव आले. त्यामुळे वकिलांच्या संरक्षणासाठी कायद्याचा मसुदा तयार करून तो वकील संघांकडे सूचनांसाठी पाठविण्यात आला होता. महाराष्ट्रातील अनेक वकील संघांनी त्या मसुद्यामध्ये महत्वपूर्ण सूचना, सुधारणा सुचविल्या. त्याचा विचार करून ‘वकील संरक्षण कायद्याचा’ कच्चा मसुदा ॲडव्होकेट जनरल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. या प्रश्नावर राज्य वकील परिषदेतर्फे वारंवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आवाज उठविण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ‘सदर प्रश्न विचारार्थ आहे,’ असे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले होते. दरम्यान, नुकताच अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यातील वकिलावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे वकील परिषदेने वरीलप्रमाणे ठराव पारीत केला.

वकील परिषदेचे अध्यक्ष ॲड. अमोल सावंत, उपाध्यक्ष ॲड. अहमदखान पठाण, अखिल भारतीय वकील परिषदेचे सदस्य ॲड. आशिष देशमुख आणि राज्य वकील परिषदेचे सदस्य ॲड. मोतीसिंग मोहता, वसंतराव साळुंके, अण्णाराव पाटील, जयंत जायभावे, अनिल गोवरदिपे, विठ्ठल कोडे देशमुख, संग्राम देसाई, पारिजात पांडे, गजानन चव्हाण, मिलिंद थोबडे, अविनाश भिडे, वसंतराव भोसले, सुभाष घाटगे, आशिफ कुरेशी, अविनाश आव्हाड, मिलिंद पाटील, हर्षद निंबाळकर, सतीश देशमुख, सुदीप पासबोला, विवेकानंद घाटगे, डॉ. उदय वारुंजीकर आणि ॲड. राजेंद्र उमाप यांची पत्रकावर नावे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Lawyers' Protection Bill: Advocates to abstain from court work on Monday.

Web Summary : Advocates across Maharashtra and Goa will abstain from court duties on Monday, November 3, 2025, demanding the Advocates Protection Bill, following attacks on lawyers. The Bar Council strongly condemns the attacks and seeks enhanced security measures.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरadvocateवकिल