मुंबई-औरंगाबाद विमानाने शहरात ८५ प्रवासी दाखल झाले. तर औरंगाबाद-मुंबई विमानाने ९९ प्रवासी रवाना झाल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. इंडिगोचे मुंबई विमान आठवड्यातून सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी राहणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रवासी संख्येत घट झाली होती. तेव्हा त्यामुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने तात्पुरती रद्द केली होती. काही दिवसांपूर्वीच इंडिगोने ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबाद विमान सुरू केले. त्यानंतर आता इंडिगोचे मुंबईचे विमानही सुरू झाले आहे. दुसरीकडे कोरोना प्रादुर्भावात आठवड्यातून ५ दिवस उड्डाण करणारी एअर इंडियाची दिल्ली आणि मुंबई विमानसेवा आता दररोज उड्डाण घेत आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवशांच्या सुविधेत मोठी भर पडली आहे. औरंगाबादेतून आता बंगळुरू आणि अहमदाबादची विमानसेवा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
इंडिगोच्या मुंबई विमानसेवेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:02 IST