शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

दरोड्यामुळे लातूरचा सराफा बाजार हादरला !

By admin | Updated: December 9, 2015 23:55 IST

राजकुमार जोंधळे , लातूर साखरा पाटी येथील एका पेट्रोलपंपातील कॅश रुममध्ये विश्रांती घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना तुफान हाणामारी करून रोख रक्कम लुटल्याची घटना ताजी असतानाच

राजकुमार जोंधळे , लातूरसाखरा पाटी येथील एका पेट्रोलपंपातील कॅश रुममध्ये विश्रांती घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना तुफान हाणामारी करून रोख रक्कम लुटल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री लातूरच्या सराफा बाजारातील एका कारागिराच्या दुकानात दरोडा पडला. हा दरोडा जिल्ह्यातील सर्वात मोठा दरोडा असून, दरोडेखोरांनी दीड किलो सोने लुटले आहे. यामुळे सराफा बाजार हादरला असून, भीतीचे सावट पसरले आहे. सराफा बाजारातील सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याने दरोडेखोरांना कैद केले असले तरी त्यांची ओळख पटणे मुश्किलीचे झाले आहे. शिवाय, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे मंगळवारी बंद होते. त्यामुळे दरोडेखोरांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान राहणार आहे. लातूर जिल्ह्यात रेणापूर ते आष्टामोड, किनगाव ते कोपरा, खरोळा शिवार, वासनगाव परिसर, औसा तालुक्यातील आशिव येथील एका बारवर आणि लातूर शहरातील मंत्री नगर, औसा रोड परिसर, साई रोड परिसर आदी ठिकाणी दरोडा पडल्याच्या घटना गतवर्षभरात घडलेल्या आहेत. या दरोड्याची तीव्रता तितकीशी चर्चेत नव्हती. परंतु, साखरा पाटी येथे एका पेट्रोलपंपावर गेल्या जुलै महिन्यात दरोडा पडला होता. ऐन दिवाळीत साईरोड परिसरात मोठी घरफोडी झाली होती. तब्बल २८ तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी घर फोडून लंपास केले. चोरीचा गुन्हा दाखल झाला. परंतु, अद्याप चोरट्यांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. साखरा पाटी पेट्रोलपंपावरील अपवाद वगळता अनेक मोठ-मोठ्या चोरीच्या घटनांतील तपास लागला नाही. आता मंगळवारी झालेल्या दरोड्याबाबत तपासात किती गती येईल, हे येणाऱ्या काळात दिसेल. परंतु, सध्या लातूरच्या सराफा बाजारातील व्यापारी कमालीचे धास्तावले आहेत. ४जून ते सप्टेंबर या काळात चोरट्यांकडून धाडसी दरोडे, घरफोड्या आणि जबरी चोरीच्या घटना घडल्या. जूनमध्ये १९ घरफोड्या, ६४ विविध चोरीच्या घटना, जुलै १८ घरफोड्या तर ४६ विविध चोरीच्या घटना आणि आॅगस्ट १८ घरफोड्या तर ६० विविध चोरीच्या घटना घडल्या असून, तीन महिन्यात घरफोडीच्या एकूण घटना या ५५ घरफोडी तर चोरीच्या १७० घटनांची नोंद आहे. तीन महिन्यांत चोरट्यांनी तब्बल ११२ कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र यातील बहुतांश घटनांतील आरोपींचा शोध पोलिसांना लागला नाही.जिल्ह्यातील रेणापूर, किनगाव आणि उदगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाटमारीच्या घटनेतील दरोडेखोराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ रिव्हॉल्वर आणि १८ जिवंत काडतुसे जप्त केले होते.४किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटोदा, रेणापूर तालुक्यातील खरोळा आणि उदगीर तालुक्यात दरोडेखोरांनी दोन महिन्यापूर्वी दरोडे टाकत लुटालुट केली होती़ या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पकडले. त्यांच्याकडून १ देशीमेड व ४ जिवंत काडतुसे जप्त केली होती. जुन्या घटनांतील दरोडेखोरांची हिस्ट्री तपासली जाणार आहे.