लातूर : लातूर शहर महानगरपालिकेत माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती दिली नसल्याच्या कारणावरून राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने मनपाच्या माहिती अधिकाऱ्यांना दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़ स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर गृहनिर्माण सहकारी संस्थेबाबत ओमप्रकाश आर्य यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती़ त्या संदर्भातील अपील २१ एप्रिल २०१५ रोजी करण्यात आले होते़ १ महिन्याच्या आत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले़ ते मनपाने पाळले नाहीत़ गृहनिर्माण संस्थेत अनधिकृत बांधकामाबाबत माहिती मागविली होती़ परंतु, मनपाच्या माहिती अधिकाऱ्यांनी ती दिली नाही़ त्यामुळे ओमप्रकाश आर्य यांनी राज्य माहिती आयोग औरंगाबाद खंडपीठात १५ आॅक्टोबर २०१५ रोजी अपील केले़ त्याचा निकाल नुकताच लागला असून, त्यात महापालिका जनमाहिती अधिकाऱ्यांना दोन हजार रूपये अपीलकर्त्यास द्यावे, असे आदेश दिले आहेत़ शिवाय, अपिलार्थ्यांनी मागितलेली माहिती विनाशुल्क द्यावी, असेही निर्देश दिले आहेत़
लातूर मनपाला दोन हजार रुपयाचा दंड
By admin | Updated: April 6, 2017 23:24 IST