शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:39 IST

एअर इंडियाच्या चुकीमुळे झाले प्रवाशांचे हाल

ठळक मुद्देदिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय

औरंगाबाद : एअर इंडिया विमान कंपनीमार्फत स्वातंत्र्यदिनी मुंबई- औरंगाबाद- दिल्ली, असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कंपनीच्या चुकीमुळे चांगलीच तारांबळ उडाली आणि या सर्व धावपळीत काहीही चूक नसताना निष्कारण मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या ३० प्रवाशांचे विमान हुकले.

दि.१५ आॅगस्ट रोजी उड्डाण करणारे एएल-४४२ हे मुंबई- औरंगाबाद- दिल्ली विमान नियोजित वेळेच्या तीन तास उशिरा औरंगाबादला येईल, असे मेलच्या साहाय्याने दि.१४ आॅगस्ट रोजी प्रवाशांना कळविण्यात आले होते. त्यानुसार विमानाचे उड्डाण मुंबई येथून दु. ३.२५ ऐवजी सायं. ६.३० ला होणार होते. त्यामुळे विमानाला उशीर असल्यामुळे प्रवासी बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर आले आणि विमान चक्क नियोजित वेळेवर येऊन त्याचे औरंगाबादकडे उड्डाणही झाले असल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. यामुळे काहीही चूक नसताना विमान हुकल्यामुळे प्रवाशांना मात्र ऐनवेळी प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागले.

कामानिमित्त मुंबई- औरंगाबाद असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अगोदरच त्यांच्या मुंबई- औरंगाबाद प्रवासाचे तिकीट आरक्षित करून ठेवलेले होते; पण ऐनवेळी नियोजनाच्या अभावामुळे झालेला गोंधळ प्रवाशांचा तणाव वाढविणारा आणि ऐनवेळी त्यांना धावपळ करायला लावणारा ठरला.उद्योजक रवी माछर याविषयी सांगताना म्हणाले की, त्यांना एअर इंडिया कंपनीचा विमानाच्या उड्डाणाला उशीर होण्याविषयी माहिती देणारा मेल दि.१४ आॅगस्ट रोजी मिळाला. त्यामुळे ते उद्योजक मधुसूदन अग्रवाल यांच्यासह  बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर पोहोचले असता त्यांना औरंगाबादला जाणारे विमान नियोजित वेळेवर म्हणजेच दु. ३.३० वा. औरंगाबादसाठी रवाना झाल्याचे समजले. अग्रवाल हे रक्षाबंधनासाठी मुंबईहून औरंगाबादला येत होते. औरंगाबादचे काम आटोपून त्यांना त्याचदिवशी सायंकाळी दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र, त्यांचे विमान हुकल्यावर ते चार्टर्ड प्लेनने औरंगाबादला आले आणि माछर हे अग्रवाल यांच्यासह याच विमानात औरंगाबादला आले. कंपनीच्या गलथान कारभारामुळे तब्बल ३० प्रवाशांचे विमान हुकले असल्याची बाब मुंबई विमानतळावर निदर्शनास आल्याचेही माछर यांनी सांगितले.

उद्योजक नंदकुमार कागलीवाल यांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले की, आम्हाला मेलवरून सूचना आल्यानुसार आम्ही उशिरा विमानतळावर पोहोचलो; पण विमान आगोदरच्याच वेळेला रवाना झालेले होते. या सर्व गोष्टीमुळे मला मुंबई ते शिर्डी असा प्रवास निरर्थक करावा लागला आणि शिर्डीहून मग मी औरंगाबादला आलो. असे केले नसते, तर एकच विमान असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच्या विमानापर्यंत मुंबईला वाट पाहत विनाकारण ताटकळत बसावे लागले असते. 

गलथानपणाआधीच तोट्यात असलेल्या एअर इंडिया कंपनीला गलथान कारभारामुळे वेळोवेळी प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याविषयी एअर इंडियाच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोयप्रवाशांच्या पुढील सर्वच प्रवासाचे नियोजन या प्रकारामुळे विस्कळीत झाले. या घटनेमुळे औरंगाबाद येथून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय झाली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ