कळमनुरी : आरटीई कायद्यानुसार तालुक्यात प्राथमिक पदवीधरची १९९ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी तालुकास्तरावर याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. सोनुने यांनी सांगितले.पदवी व बी.एड. झालेले ५३ शिक्षक आहेत. तर फक्त पदवी झालेले २८९ शिक्षक आहेत. आरटीईनुसार पदवी झालेल्यांनाही प्राथमिक पदवीधर म्हणून पदोन्नतीसाठी पात्र आहेत. तालुक्यात ३४२ जण प्राथमिक पदवीधरच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरत आहेत. पदोन्नतीसाठी यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. पात्र शिक्षकांची जन्म तारीख, त्यांचा नेमणूक दिनांक, त्यांची शाळा, पदवीचे विषय, विद्यापीठ, पदवीची सेवापुस्तिकेत नोंद आहे का? याची तपासणी सुरू आहे. तपासणी झाल्यानंतर या याद्या व अहवाल येत्या सोमवारपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केला जाणार आहे. भाषा विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयात किती शिक्षक पदवी उत्तीर्ण आहेत? ही माहिती पाठविली जाणार आहे. जिल्हास्तरावर सेवाज्येष्ठतेची यादी तयार होऊन त्यानुसार पात्र शिक्षकांना समुपदेशनाद्वारे प्राथमिक पदवीधरची पदोन्नती दिली जाणार असल्याचेही सोनुने यांनी सांगितले. (वार्ताहर)
शिक्षकांच्या पदोन्नतीचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Updated: July 27, 2014 01:17 IST