शिरीष शिंदे , बीडयेथील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात शुक्रवारपासून गणपती मंडळाच्या आॅनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. वरिष्ठ कार्यालयाकडून आयडी व पासवर्ड न मिळाल्यामुळे प्रक्रियेस उशीर झाला आहे; मात्र पुढील चार-पाच दिवसांमध्ये आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणे शक्य आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधीन नियमानुसार सार्वजनिक कार्य उत्सवासाठी धर्मदाय कार्यालायकडून परवाना देण्यात येतो. गतवर्षी या कार्यालयात अर्ज स्वीकृत करून परवाना दिला जात होता. हा आॅफलाईन पद्धतीचा प्रकार आहे; मात्र यावर्षी आॅनलाईन व आॅफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने परवाना देण्यास सुरुवात झाली होती. २१ दिवसांपासून गणपती मंडळाची नोंदणी आॅफलाईन पद्धतीने सुरु आहे. आॅफलाईन पद्धतीने आतापर्यंत २५० परवाने दिले गेले आहेत. शनिवारी अर्ज स्वीकृती होईल. रविवार व सोमवारी सुटी असल्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. पूर्ण अर्ज असणाऱ्या गणेश मंडळांना तात्काळ परवाना दिला जाईल. आॅनलाईनसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून आयडी व पासवर्ड मिळाला नसल्यामुळे काहीसा विलंब झाला होता. पासवर्ड व आयडी प्राप्त झाला आहे. जी गणेश मंडळे वर्गणी गोळा करणार आहेत, त्यांनीच परवान्यासाठी नोंदणी करावी, असे सहायक धर्मदाय आयुक्त एस.पी. पाईकराव यांनी सांगितले.
अंतिम टप्प्यात आॅनलाईन परवान्यास सुरुवात
By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST