शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर’च्या कंपनीला शेवटचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:46 IST

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही.

ठळक मुद्दे५ जानेवारीला बैठक : कंपनी अटींवर ठाम

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही. कंपनीतील मुख्य भागीदार बदलण्याची मुभा द्यावी या अटीवर कंपनी ठाम आहे. महापालिका ही अट कदापिही बदलू शकत नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न मनपाकडून करण्यात येत आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी दोनदा कंपनीसोबत बैठक झाली आहे. प्रत्येक बैठकीत कंपनीने भागीदार बदलण्याची मुभा द्या, महापालिकेने मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याची मुभा द्यावी, जुनी थकबाकी ५० कोटी द्यावी आदी अटी टाकल्या आहेत. या गंभीर पेचात महापालिकेने राज्य शासनाच्या तीन वेगवेगळ्या विभागांकडे अभिप्राय मागविले. आजपर्यंत मनपाला उत्तर मिळाले नाही. समांतर जलवाहिनीचे पैसे मनपाकडे पडून आहेत. तरीही काहीच करू शकत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्याचा अंतिम न्याय निवाडाही होत नाही. कंपनी पुन्हा कामही करायला तयार नाही. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी स्वंतत्र निविदाही मनपा काढू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मनपाला सूचित केले होते की, कंपनीसोबत बसून अंतिम निर्णय घ्या. मनपाने आतापर्यंत चार ते पाच वेळेस प्रयत्न केले. कंपनी मनपाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास तयार नाही. आता ५ जानेवारी रोजी कंपनी बैठकीला उपस्थित राहील किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई