शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी माणुसकी धावली; पोटच्या लेकरांनी असमर्थता दर्शवल्याने समाजसेवकांनी दिला वृद्धेला अग्निडाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:25 IST

सुरत येथे एका कंपनीत काम करणाऱ्या 2 मुलांनी आई व वडील यांना ४ वर्षांपूर्वी चिंचपूर येथील एका वृद्धाश्रमात आणून सोडले.

ठळक मुद्देअंतिम दर्शन घेण्यासाठी मुलगी ही आली नाही

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड ( औरंगाबाद ) : गेल्या 4 वर्षांपासून दोन्ही मुलांनी वृद्धाश्रमात सोडलेल्या आईचे अखेर प्यारॅलीसेस व वर्धापकाळाने निधन झाले. पोटच्यामुलांना संपर्क न झाल्याने त्या 75 वर्षीय वृद्धेला समाजसेवकांनी  खांदा देऊन अग्निडाग दिल्याची घटना चिंचपूर येथे बुधवारी घडली. त्यांच्या मुलींशी संपर्क झाला मात्र अंतिम दर्शन घेण्यासाठी तिने नकार दिला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरत येथे एका कंपनीत काम करणाऱ्या पोटच्या 2 मुलांनी आई शशीकलाबाई पवार ( 75 ) व वडील चुनीलाल पवार ( 80 , रा.फुलंब्री ) यांना ४ वर्षांपूर्वी चिंचपूर येथील एका वृद्धाश्रमात आणून सोडले. यानंतर त्यांची एकदाही विचारपूस केली नाही. पालक वारंवार संपर्क करतील म्हणून  फोन नंबर देखील दिला नाही. यामुळे शशिकला यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलांशी संपर्क करता आला नाही. तर मुलीला माहिती दिली असता, हे मुलांचे काम आहे असे सांगून अंत्या दर्शनाला देखील येणे टाळले. याची माहिती मिळताच मदतीला माणुसकी समूहाची टिम धावून आली. त्यांनी वृद्धेच्या मृतदेहाला खांदा देत अग्निडाग दिला. दरम्यान,  मागील वर्षी चुंनीलाल पवार याचे ही याच वृद्धाश्रमात  वर्धापकाळाने निधन झाले होते. त्यावेळी सुद्धा त्यांच्या मुलांशी संपर्क न झाल्याने समाज सेवकांनीच अंतिम संस्कार केले होते . 

शीवप्रभा चारेटेबल ट्रस्ट्, सुलक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे अनिल लुनिया, परशरामजी नरावडे, बद्रीनाथ भालगडे, समाजसेवक सुमित पंडित, प्रशांत दद्दे, बाळासाहेब राठोड, जगन शिरसाट, किशोर माने, गोकुळ खटावकर, जितेंद्र निंबाळकर, संतोष शळके, चद्रकांत गीते, निलेश चौथे, कचरु सुरडकर, संदीप पाठक, कृष्णा दनके, एकनाथ आगाम, सागर दनके, परमेश्वर दनके, कृष्णा उमक व माणुसकी समुहाचे सर्व सभासद मदतीसाठी धावले.

त्यांना' दुःख देण्याचा आमचा काय अधिकारआई-वडिलांना कोणत्याही परीस्थितीमध्ये एकटे सोडून देणे ही माणुसकी नाही. ज्यांच्यामुळे जग पाहिले त्यांना दुःख देण्याचा अधिकार नाही.- सुमित पंडित समाजसेवक औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक