शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोगस खेळाडूंना शेवटची संधी; शासनाची 'बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 14:05 IST

अनेक उमेदवार बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवतात व त्याआधारे शासनाची नोकरी मिळवतात.

औरंगाबाद : बोगस खेळाडू प्रमाणपत्रधारक युवा उमेदवारांचे संपूर्ण भवितव्य अडचणीत येऊ नये, यासाठी अशा उमेदवारांना एक संधी देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे ‘बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना’ राबवण्यात येणार आहे.

शासनाने अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण ठेवले आहे. मात्र, अनेक उमेदवार बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवतात व त्याआधारे शासनाची नोकरी मिळवतात. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित उमेदवार गैरव्यवहार करतात. कालांतराने शासनाच्या चौकशीत असे खेळाडू दोषी आढळतात. त्यामुळे अशांना शासनातून बडतर्फ केले जाते. तसेच त्यांना अवहेलनेला सामोरे जावे लागते. ज्या उमेदवारांकडे बोगस क्रीडा प्रमाणपत्र आहे. मात्र, शासन सेवेत नियुक्ती झाली नाही अशा उमेदवारांवर आयुष्यभर कारवाईची टांगती तलवार असते. सदरची बाब विचारात घेऊन, सद्यस्थितीत बोगस खेळाडू उमेदवारांविरुद्ध करण्यात येत असलेल्या कारवायांमुळे, अनवधनाने व भूलथापांना बळी पडलेल्या बोगस खेळाडू प्रमाणपत्र युवा उमेदवारांचे भवितव्य अडचणीत येऊ नये यासाठी त्यांना एक संधी द्यावी, या हेतूने शासनातर्फे ‘बोगस क्रीडा प्रमाणपत्र क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेस मान्यता दिली आहे.

योजनेची उद्दिष्ट्ये१. उमेदवारांनी त्यांच्याजवळील बोगस क्रीडा प्रमाणपत्रे पडताळणी अहवाल शासनाकडे जमा करून घेणे२. बोगस प्रमाणपत्राआधारे दावा करणाऱ्यांना शासन सेवेतील प्रवेश प्रतिबंधित करणे व वैध क्रीडा प्रमाणपत्र धारकांना आरक्षणाच्या पदासाठी संधी उपलब्ध करून देणे.समर्पण योजनेत सहभागी होणाऱ्या युवा उमेदवारांना पुढील काळात कायद्याचे पालन करणारे जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगण्यास प्रवृत्त करणे.

योजनेचे स्वरूपबोगस प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या खेळाडूंनी सदरची मूळ प्रमाणपत्रे, क्रीडा पडताळणी अहवाल क्रीडा आयुक्त, पुणे यांच्याकडे ३१ मेपर्यंत समर्पित करावीत. सदरील मुदतीत अशा बोगस प्रमाणपत्र जमा करणाऱ्या कोणत्याही उमेदवारास यासंदर्भात शासनाच्या अधिपत्याखालील कोणत्याही कार्यालयातून अतिरिक्त विचारणा केली जाणार नाही, अथवा त्यास चौकशीस सामोरे जावे लागणार नाही. सदर उमेदवारांविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात येणार नाही. तसेच क्रीडा प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा करणाऱ्या उमेदवारांच्या नावाची गोपनीयता बाळगण्यात येईल. याबाबतची जबाबदारी आयुक्त व युवक सेवा संचालनालय स्तरावर राहणार आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राबाबतचा मूळ दस्तावेज शासनाकडे जमा न करणाऱ्या, बोगस प्रमाणपत्र धारक सर्व उमेदवारांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध आणि त्यांना बोगस प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या संबंधित खेळाच्या संघटनेविरुद्ध नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNandedनांदेडlaturलातूर