शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:12 IST

शेती, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ठळक मुद्देविभागीय प्रशासनाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत बोगस खतविक्री प्रकरणात कारवाया करण्यात आल्या.

औरंगाबाद : मराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करून शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्यास प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनालाही सहभागी करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यात सुमारे १ कोटी रुपयांचा बोगस खतांचा अवैध साठा पकडण्यात आला. या कारवाईमुळे अनेक खतांच्या कंपन्यांना कुलूप लागले असून, मालक मराठवाडा सोडून पसार झाले आहेत. खतांचा अवैध साठा, तसेच बनावट खत उत्पादन व विक्रीत मोठ्या महाभागांचा सहभाग आहे. विभागीय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित खत कंपनीमालकांवरच थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बोगस खत प्रकरणात अहवाल आल्यानंतर एकेकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खतांमध्ये राख मिसळली जात आहे. लॅबमध्ये नमुने तपासणीसाठी पाठविले, तर लॅबही मॅनेज करण्याचा प्रकार केला जात आहे. नांदेडमध्ये खत उत्पादक कंपनीचे मालक हे राजकारणाशी निगडित आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल होण्यातच अडथळे येत आहेत. खतांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने आजवर १५ ते १७ कंपन्या बंद केल्या असून, सदरील खत उत्पादक पळून गेले आहेत.

जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत बोगस खतविक्री प्रकरणात कारवाया करण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूरपाठोपाठ फुलंब्री, कन्नड आणि शेंद्रा येथे कारवाई करण्यात आली. गुजरात येथून माल भरून आणल्यानंतर स्थानिक पातळीवर प्लास्टिक बकेटमध्ये रॅपरिंग करून खतविक्री करण्याचा धंदा चव्हाट्यावर आला. खतांच्या बॅगांवर खतातील मूळ व खऱ्या घटकांचा उल्लेखही केला जात नाही. अन्नद्रव्यांचा वाटेल तितक्या प्रमाणात उल्लेख करून शेतकऱ्यांना तो माल विक्री केला जात होता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष घालून कारवाईचे आदेश विभागीय प्रशासनाने दिले आहेत.  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय