शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचा बाजारात दुभत्या म्हशीला मोठी मागणी; जाफराबादीचा भाव सव्वा ते दीड लाख

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 13, 2024 13:24 IST

छावणीतील आठवडीबाजार हा खास म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर : छावणीत दर गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजारात दुभत्या म्हशीला मोठी मागणी वाढली आहे. त्याचे कारणही तसेच आहे उन्हाळ्यात दुधाचे प्रमाण कमी होते, अशावेळी दुभत्या म्हशी खरेदी करून दुधाचा तुटवडा काही प्रमाणात कमी केला जातो. यामुळे सध्या म्हशीचे भाव सव्वा ते दीड लाखाच्या वर जाऊन पोहोचले आहे.

म्हशीच्या विक्रीसाठी प्रसिद्धछावणीतील आठवडीबाजार हा खास म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून लोक येथे म्हशी खरेदीसाठी येत असतात. दर आठवडी बाजारात २५ पेक्षा अधिक म्हशी विकल्या जातात.

का वाढले भाव?उन्हाळ्यात म्हशी दूध कमी देतात. यामुळे मागणी तेवढीच पण दुधाचा तुटवडा जाणवत आहे. मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी जनावरांचे मालक नवीन म्हशी खरेदी करतात. मागणी वाढताच म्हशीच्या किमती २५ हजार ते ३० हजार रुपयांनी वाढल्या आहेत. धुळे, गुजरातहून येणाऱ्या म्हशीला सव्वा ते दीड लाखाचा भाव मिळत आहे. तर स्थानिक म्हशीला ८० हजार ते ८५ हजारांचा भाव मिळत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

जाफराबादी म्हशीला मागणीगुजरातमधील जाफराबाद येथील म्हशीला छावणी बाजारात जास्त भाव मिळत असतो. त्यात दुभती म्हशी दिवसभरात १६ ते २० लिटरपर्यंत दुध देत असल्याने या म्हशी जास्त किंमत देऊन खरेदी केले जातात. ‘जाफराबादी म्हशी’ नावानेच विकल्या जातात. एका-एका म्हशीचे वजन ८०० किलो ते १ टनापर्यंत असते.

जाफराबादी म्हशीचे वैशिष्ट्यजाफराबादी म्हशीच्या कपाळावर पांढरा रंगाचे निशाण असतो, या म्हशीच्या शरीराच्या मानाने चेहरा लहान असतो, तसेच शिंग गोलाकार असतात. या म्हशीचा रंग काळाभोर असतो, अशी माहिती पशुपालक हरीश पवार यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रmilkदूध