शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सालारजंग व खरेदी-विक्री संघात जमिनीचा वाद; मालमत्तेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:48 IST

सालारजंग व खरेदी-विक्री संघात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वादातून मंगळवारी खरेदी-विक्री संघाने पोलीस बंदोबस्तात जमिनीवर असलेल्या गोदामाला टाळे ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सालारजंग व खरेदी-विक्री संघात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वादातून मंगळवारी खरेदी-विक्री संघाने पोलीस बंदोबस्तात जमिनीवर असलेल्या गोदामाला टाळे ठोकले. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मुळात पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने सालारजंग मालमत्तेचा ताबा असलेल्या गटाने संताप व्यक्त करीत पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत जमिनीचा ताबा द्यावा, अशी मागणी केली आहे.जिन्सी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या खरेदी-विक्री संघ आणि सालारजंग मालमत्तेवरून दोन गटांत सध्या वाद सुरू आहे. २३ मार्च रोजी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक सय्यद मुनीर अली सय्यद रियासत अली (६०) यांनी सध्या सालारजंग प्रॉपर्टी असल्याचा दावा करीत असलेल्या शेख शकील शेख छोटू यांच्यासह सहा जणांनी जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिन्सी ठाण्यात केली होती. त्यावरून पोलिसांनी शेख शकील याला अटक करीत तात्काळ जामीन दिला होता. यानंतर गेल्या आठवडाभरापासून यावरून दोन्ही गटांत वाद सुरू आहे. त्यातच नव्याने सालारजंग प्रॉपर्टीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करीत असताना मंगळवारी अचानक आर्थिक गुन्हे शाखेसह जिन्सी पोलिसांनी बंदोबस्त मागविला. पोलीस बंदोबस्तात तेथील गोदाम रिकामे करीत कुलूप लावून त्याच्या चाव्या खरेदी-विक्री संघाला दिल्या. तेथील साहित्यही पोलिसांनी जप्त केले. मात्र, या गोदामाला केवळ समोरून कुलूप लावण्यात आले आहे. या जमिनीचा वाद सालारजंग प्रॉपटीर्शी जोडला जात असल्याची चर्चा आहे. शेख शकील व अन्य सहा जणांनी सालारजंग प्रॉपर्टी विकसित करण्यासाठी घेतल्याची कागदपत्रे सादर केल्याचा दावा केला आहे, तर पोलिसांनी ताबाधारकांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगPoliceपोलिस