शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतून होणार भूसंपादन

By विकास राऊत | Updated: July 14, 2025 14:10 IST

चार किलोमीटरच्या दौलताबाद बायपाससाठी १९ हेक्टर जमीन घेणार

छत्रपत संभाजीनगर : तालुक्यातील अब्दीमंडी येथील गट क्र. ११, १२, २६, ३७ व ४२ पैकी ११, १२, ३७ पैकी ११, १२ व ३७ वादग्रस्त गटांतील भूसंपादन दौलताबाद बायपासच्या अनुषंगाने सुरू होणार आहे. या गटातील (ई.व्ही. प्रॉपर्टी) जमिनीचा फेरफार गेल्यावर्षी झाल्याने महसूल प्रशासन गोत्यात आले होते. दौलताबाद भागातील नवीन ३.८ कि.मी. बायपास रस्त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनासाठी त्या जमिनीची घाईगडबडीत खरेदी-विक्री करून एका दिवसांत सात-बाऱ्यात फेरफार केल्याचा व्यवहार का झाला, हे आता स्पष्ट झाले आहे.

ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात गट क्र. ११, १२, २६, ३७ व ४२ येथील जमिनीचा कागदोपत्री सोपस्कार झाला. ती जमीन शत्रूसंपत्ती आहे की नाही, निर्वासित आहे की, खासगी मालकीची याचा संभ्रम अजूनही कायम आहे.

शत्रूसंपत्ती म्हणून त्या जागेवर महसूल प्रशासनाने बोर्ड लावला होता, तर निर्वासित मालमत्ता म्हणून त्याबाबत न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने निर्णय दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘लोकमत’ने याप्रकरणी जमिनीच्या खरेदी-विक्रीनंतर ज्यांच्या नावे जमीन झाले, त्याबाबत चौकशी करण्यात आली. दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे १५० जणांची १९ हेक्टर जमीन संपादन होणे शक्य आहे. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार एकास चाैपट दर अशा पद्धतीने भूसंपादन झाल्यास अब्दीमंडीतील या वादग्रस्त जमिनीतून सुमारे १४.५ एकर जमीन रस्त्यात जाणार आहे. सध्या वादग्रस्त गटातील खरेदी-विक्री थांबलेली आहे.

२१ कोटींतून बायपासचे चौपदरीकरणएनएचएआयने मध्य प्रदेशच्या क्लासिक इन्फ्रा या संस्थेला २१ कोटींतून ३.८ कि.मी. चौपदरीकरणाचे काम दिले आहे. ४५ कोटींची निविदा होती. सुमारे ५३ टक्के कमी दराने क्लासिकने हे काम घेतले. आठ महिने कामाची मुदत आहे. १२ कोटी भूसंपादनासाठी लागतील. ग्रीनबेल्ट, चार चौकांचा कामात समावेश आहे.

कोणत्या गटातून होणार आहे मोजणी ?अब्दीमंडीतील गट नं.११, १२, १३, १६, १८, १९, २१, २२, २४, २५, ३७ व ३९ मध्ये भूमी अभिलेख विभागाने मध्यंतरी अतितातडीने मोजणी केली आहे. यापैकी ११, १२ व ३७ क्रमांकाच्या गटासह इतर १९ गटांतील भूसंपादनाची अधिसूचना एनएचएआयने कलम ३ नुसार प्रसिद्ध केली आहे. ०५४७५६ क्रमांकावर रजिस्टरमध्ये जमीन मोजणीची नोंद आहे. वादग्रस्त गटाप्रकरणी काही आक्षेप आले, तर त्यावर एनएचएआय भूसंपादन विभाग निर्णय घेईल.

कायदेशीररीत्या भूसंपादनदौलताबाद बायपास ३.८ कि.मी.चा रस्ता असून तो ४५ मीटर रुंद असेल. कायदेशीररीत्या सर्व बाबी समजूनच भूसंपादन होईल.- विजय राऊत, भूसंपादन अधिकारी एनएचएआय

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभाग