शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘लाल परी’ला मिळाल्या ५ महिला चालक; पण ‘स्टिअरिंग’पासून दूर, तिकीट फाडताय 

By संतोष हिरेमठ | Updated: June 10, 2023 19:32 IST

४ वर्षांच्या खडतर प्रवासानंतर बसस्थानकांत अखेर नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर :एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात म्हणजे जिल्ह्यात तब्बल ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ५ महिला चालक मिळाल्या. चालक तथा वाहक असे त्यांचे पद आहे. राज्यात काही ठिकाणी महिला चालक म्हणून कर्तव्य बजावणे सुरूही झाले. मात्र, विभागात सध्या वाहकांचा तुटवडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला चालक अजूनही ‘स्टिअरिंग’पासून दूरच असून, वाहक म्हणूनच त्या जबाबदारी पार पाडत आहेत.

एसटी महामंडळात २०१९ मध्ये ‘ चालक कम वाहकपदी’ महिलांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशिक्षणावर परिणाम झाला. अखेर जवळपास ४ वर्षांच्या कालावधीनंतर प्रशिक्षणाचा कालावधी संपला आणि प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पार करणाऱ्या महिलांना १ जून रोजी विविध आगारांमध्ये पोस्टिंग देण्यात आली. यात शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात ३ आणि गंगापूर, वैजापूर आगारात प्रत्येकी एका महिला चालक कम वाहकाची नियुक्ती करण्यात आली. परंतु, आजघडीला जिल्ह्यात जवळपास ९८ वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे या महिला वाहकांना अजूनही चालक म्हणून कोणत्याही कर्तव्यावर पाठविण्यात आलेले नाही.

विभाग नियंत्रक म्हणाले...विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, चालक तथा वाहक हे पद ज्यावेळी जी आवश्यकता भासेल, त्यानुसार आगारस्तरावर त्यांचा उपयोग करण्यात येतो. आगामी काळात चालक कमतरता झाल्यास आगारस्तरावर तसा वापर करता येईल.

जिल्ह्यातील महिला एसटी चालकमध्यवर्ती बसस्थानकात शोभा प्रभाकर मोरे, रमा गायकवाड आणि जयश्री आर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर वैजापूर आगारात वणिता मोरे आणि गंगापूर आगारात विजू वावळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद