शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

पैठण येथे लाखो भाविक नाथचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:16 IST

नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारक-यांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रभरातून ५३७ दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्याची नोंद न.प.कडे झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वारक-यांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देनाथषष्ठीसाठी ५३७ दिंड्या दाखल : वारक-यांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारक-यांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रभरातून ५३७ दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्याची नोंद न.प.कडे झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वारक-यांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले. यंदा दिंडीसोबत वारकºयांची संख्या कमी असली तरी वाहनाने येणाºया वारकºयांच्या संख्येत मोठी वाढ झाली.बोंडअळी व गारपिटीमुळे यंदा भाविकांची संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता; परंतु नाथांवर असलेली अपार श्रद्धा वारक-यांना रोखू शकली नाही. षष्ठीपूर्व नगर परिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केल्याने व शहरात दाखल होणाºया रस्त्यांची कामे झाल्याने वारकºयांना सुटसुटीत रस्ते उपलब्ध झाले व वाहतूकही जाम झाली नाही.स्वयंसेवी संस्थांचे कार्यवारकरी व भाविकांना सेवा व सुविधा पुरवून प्रशासनास मदत होईल, असे महत्त्वपूर्ण काम विविध स्वयंसेवी संस्था करीत आहेत, त्यात मंदिर परिसरात दर्शन व्यवस्थेत सहकार्य करण्यासाठी ३२५ स्वयंसेवकांसह अनिरुद्ध अकॅडमी, यांच्यासह रामकृष्ण मिशन आश्रमचा मेडिकल कँप, स्वकाम सेवा मंडळाची स्वच्छता, जय बजरंग संघ, सावन कृपाल रुहानी मिशन, ज्येष्ठ नागरिक संघ, पाथर्डी, संत एकनाथ सेवा संघ, रेड स्वस्तिक व शांतिब्रह्म संत एकनाथ वारकरी सेवा प्रतिष्ठान यांचा समावेश आहे.विजयी पांडुरंगास अभिषेकआज फाल्गुन वद्य षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालण्यात आले व विधिवत पूजा करून पुन्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याचवेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीची सुद्धा विधिवत पूजा करण्यात आली.गोदापात्रात सोडले पाणीजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये नाथषष्ठीनिमित्त वारकरी व भाविकांना स्नानासाठी जायकवाडी धरणातून बुधवारी गोदापात्रात १०० क्युसेक्स दराने पाणी सोडण्यात आले. तीन दिवस पाण्याचा विसर्ग चालू राहणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.