शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पीएसआयला बीपी वाढल्यामुळे आली भाेवळ

By राम शिनगारे | Updated: October 1, 2023 21:27 IST

बदली केली नसल्याचा दावा : सिडको ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंद

छत्रपती संभाजीनगर : सिडको ठाण्यात कर्तव्यावरील पोलिस उपनिरीक्षकांना मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून नांदेडकर नावाच्या व्यक्तीने ठाण्यातच आरडाओरड करीत गोंधळ घातला. या घटनेची स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांना थेट पोलिस आयुक्तालयातुन बोलावणे आले. त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांच्यासमोर नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश हातावर ठेवला. हा आदेश स्विकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर वादावादी झाल्यामुळे त्यांचा बीपी वाढला. त्यातच त्यांना भोवळ आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिडको पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीतील नोंदीनुसार उमेश भुसारी हे ३० सप्टेंबरला सिडको ठाण्यात गेले होते. ते झोमॅटो डिलीवरी बाॅय म्हणून काम करतात. त्यांना मध्यरात्री एन-८, सिडकोतील सरकारी दवाखान्यासमोर आडवून दोघांनी पार्सल खाण्यासाठी दे म्हणत मारहाण केली होती. त्याबाबत त्यांना तक्रार द्यायची होती. ते ठाण्यात गेले तेव्हा त्याठिकाणी ड्यूटी अधिकारी उपनिरीक्षक शिंदे या एक तक्रार नोंदवून घेत होत्या. त्यामुळे भुसारी यांना थोडे थांबण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच एका कामानिमित्त नांदेडकर नावाचे व्यक्ती ठाण्यात आले. तेथे भुसारी यांनी त्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा नांदेडकर यांनी उपनिरीक्षक शिंदे यांच्यासमोर जात तुम्ही तक्रार का घेत नाही?, तुम्हाला बोलण्याची पद्धत आहे का?, मी कोण आहे हे माहिती आहे का?, मी आ. सावे यांचा पीए आहे. साहेबाकडे तुमची तक्रार करतो, असे म्हणून शिंदे यांच्यावर मंत्री सावे यांच्या नावाचा दबाव टाकला. या पद्धतीची नोंदही स्टेशन डायरीत केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे.बदली केलेली नाही

दरम्यान, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांना याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, संबंधित पोलिस उपनिरीक्षकास काय घटना घडली आहे. याविषयीची माहिती घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयात बोलावले होते. त्यांच्या बदलीचा आदेश काढलेला नाही. त्यांची बदली केलेली नाही. त्यांची प्रकृती ठिक असून, खाजगी रुग्णालय प्रशासनासोबतही बोलणे झाले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस