शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात ‘लेडी मुन्नाभाई’ला सुरक्षारक्षकांनी पकडले, पोलिसांनी सोडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:58 IST

पैसे उकळत असल्याचे समजल्यावरून ॲप्रन घातलेल्या तरुणीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले, घटनेची रुग्णालयात एकच चर्चा

औरंगाबाद : डाॅक्टर, नर्स, रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर असल्याचे भासवून पैसे उकळल्याच्या आरोपावरून गुरुवारी घाटी रुग्णालयात एका तरुणीला सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु तपासानंतर पोलिसांनी तिला सोडून दिले.

पैसे उकळत असल्याचे समजल्यावरून ॲप्रन घातलेल्या तरुणीचा सुरक्षारक्षकांनी ओपीडीत शोध घेतला. तेथे एका रुग्णाच्या नातेवाईकाने मला आताच पैसे मागितले आणि ती निघून गेली, असे सांगितले, तेव्हा सुरक्षारक्षक घाटीतून बेगमपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेले. तेथे ‘ती’ दिसली. सुरक्षारक्षकांना पाहून तिने पळ काढला. सुरक्षा पर्यवेक्षक अरविंद घुले, रामेश्वर नागरे, गणेश राठोड, जिज्ञेश पाटील यांनी पाठलाग करून तिला पकडले. तिला सुरक्षारक्षक (एमएसएफ) कार्यालयात आणून चौकशी केली, तेव्हा तिने मी मागील ८ ते ९ महिन्यांपासून घाटीतील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून ७० ते एक लाख रुपये घेतल्याचे सांगितले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पुढील कारवाईसाठी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.

४ ते ५ महिन्यांपासून शोधमी डॉक्टर आहे, मला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, माझे एटीएम ब्लॉक झाले, तुम्ही मला नगदी पैसे द्या मला, मी तुम्हाला फोन पे करते, किंवा मी उद्या तुम्हाला देते, असे सांगून मुलीने अनेकांकडून पैसे घेतले. याविषयी तक्रारी काही नातेवाईकांनी सुरक्षारक्षक कार्यालयात, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात केल्या होत्या. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून या मुलीचा शोध सुरक्षारक्षक घेत होते, अशी माहिती घाटीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

अंतर्गत प्रश्न म्हणून सोडून दिले - बेगमपुरा पोलीसएका महिलेला सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशीत ती मुलगी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित विभागातील एका महिला डॉक्टरने ठाण्यात येऊन हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणाविषयी कोणाचीही तक्रार नव्हती. त्यामुळे तिला सोडून देण्यात आले, अशी माहिती बेगमपुरा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी