शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लाडसावंगीच्या डाळिंबाला मुंबईत मिळाला सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:07 IST

२५० रुपये किलोने विकली गेली डाळींब

ठळक मुद्देदुष्काळात न डगमगता शेतकऱ्यांने घेतलेले परिश्रम आले फळाला

लाडसावंगी : म्हणतात ना की ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ या उक्तीप्रमाणे येणाऱ्या अडचणीमुळे शेतकऱ्यांनी न डगमगता मात केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे लाडसावंगी येथील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले. या शेतकऱ्याने दुष्काळात डाळिंबासाठी अथक परिश्रम घेतले आणि आज डाळिंबाला सोन्यासारखा भाव मिळाला आहे. 

लाडसावंगी परिसर एकेकाळी मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे; परंतु २०१२ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे परिसरातील बहुतांशी बागा वाळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर त्या तोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानंतर लाडसावंगी, शेलूद, चारठा, हातमाळी, नायगव्हाण, लामकाना, पिपंळखुंटा, सय्यदपूर, औरंगपूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा उभारल्या.आता हा परिसर डाळिंब झोन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मोसंबीला फळे येण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागतो, तर डाळिंबाला दीड ते दोन वर्षांतच फळे लागतात. शिवाय मोसंबीपेक्षा डाळिंबाला पाणीही कमी लागते. त्यामुळे लाडसावंगी परिसरात मोठ्या  प्रमाणात डाळिंबाच्या बागा पाहायला मिळतात. 

भर उन्हाळ्यात सगळीकडे तीव्र पाणीटंचाई असताना या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून तसेच शेततळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन डाळिंबाच्या बागा जोपासल्या. आता फळे विक्रीसाठी आली असून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना आदी बाजारपेठांमध्ये ती दाखल होत आहेत. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत डाळींबांना पहिल्यांदाच चांगला भाव मिळाल्याने लाडसावंगी परिसरातील  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाडसावंगी परिसरात गेल्या तीन महिन्यांत एकही मोठा पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाची मका, बाजरी, मूग, उडीद, कापूस ही पिके मात्र, शेवटच्या घटका मोजत आहेत.

दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न अनिल पवार या शेतकऱ्याने मुंबई येथे ३० व ३१ आॅगस्ट रोजी डाळिंब विक्रीसाठी नेले. तेव्हा त्यांच्या पाचशे ग्रॅम वजन असलेल्या डाळिंबाला तब्बल २५० रुपये किलो, दोनशे ग्रॅम वजनाच्या डाळिंबाला १५० रुपये किलो, तर डागाळलेल्या डाळिंबाला ५० रुपये किलो असा भाव मिळाला. एक एकर क्षेत्रात घेतलेल्या डाळिंबाला दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अजून अर्ध्याच्या वर माल बाकी असल्याचे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद