शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासच्या रुंदीकरणात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 19:32 IST

राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणाला बीड बायपास रस्त्याचे रुंदीकरण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडले आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणाला बीड बायपास रस्त्याचे रुंदीकरण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडले आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. रुंदीकरण करायचे असेल, तर प्राधिकरणाने हा रस्ता शासनाकडून पत्रव्यवहाराने वर्ग करून घ्यावा.  रस्त्याच्या ‘बीओटी’ कराराचे काय करायचे, कंत्राटदाराशी काय वाटाघाटी करायच्या त्याचा निर्णय शासनस्तरावर होईल, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली. 

औरंगाबाद ते जालना रोडच्या रुंदीकरणात महानुभाव आश्रम चौक ते झाल्टा फाट्यापर्यंत १४ कि़मी. बीड बायपासचा समावेश २०१० मध्ये करण्यात आला. बीओटीवर तो रस्ता विकसित करण्यात आला. जर बीओटीतून हे १४ कि़मी. अंतर वगळले, तर रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराची काहीही अडचण राहणार नाही. कॅशटोलच्या रकमेमध्ये सरकारने काही दर कमी केला तरच अडचण येईल; परंतु टोलचा दर जर कमी केलाच नाही आणि एचएआयने तो रस्ता बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करून घेतला तर त्याचे काम गतीने होऊ शकेल; परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम सातारा-देवळाई चौकातून ४ कि़मी. अंतरावर आहे. त्यामुळे बीड बायपासवर एनएचएआयने गुंतवणूक का? करावी, असा मतप्रवाह सुरू झालेला आहे. त्यामुळे बीओटीच्या  कराराचा मुद्दा समोर आणला जात असल्याचे बोलले जात आहे. 

मुख्य अभियंता म्हणाले...शासनाकडे बीओटीच्या करारावर उपाय काढण्याबाबत पर्याय आहेत. त्या रस्त्याचा टोल औरंगाबाद-जालना या चौपदरीकरणातून वसूल केला जातो. तो दर जर शासनाने कायम ठेवला, तर काहीही फरक पडणार नाही. उलट कंत्राटदाराला ७ वर्षांसाठी जी देखभाल व दुरुस्ती करायची आहे, ती त्याला करावी लागणार नाही, असे मत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता खं. तु.पाटील यांनी व्यक्त केले. 

तज्ज्ञ अभियंत्यांचे मत असे...

बीओटी करार आणि ४०० कोटींची टोल रक्कम हा सगळा दिशाभूल करणारा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञ अभियंता पी.डी.कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, बीओटीतून बीड बायपास वगळला तरी काहीही फरक पडणार नाही. वाहतूक आणि टोल वसुलीवर काहीही परिणाम होणार नाही. कंत्राटदाराला ४०० कोटी देण्याची बाब कुठून समोर आली आहे, हे कळण्यास मार्ग नाही. तो रस्ता एनएचएआयकडे हस्तांतरित केल्यास कुठलाही करारभंग होईल, असे वाटत नाही. बायपास सध्या अपघाती मार्ग झालेला आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाPoliticsराजकारणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका