शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईटी सेल-तंत्रशिक्षण’मध्ये समन्वयाचा अभाव;राज्यभरात प्रवेशाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:39 IST

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा घोळ

- राम शिनगारे 

औरंगाबाद :  अभियांत्रिकी, वैद्यकीयसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामागे सीईटी सेलच्या १८ जूनच्या ‘मेल’ची भूमिका असल्याने गुरुवारी हा मेल रद्द करण्यात आला. पाठोपाठ रात्री उशिरा नोंदणी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागातील समन्वयाच्या अभावातून हा घोळ झाल्याचे समोर आले आहे. 

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मनुष्यबळ आणि सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत सीईटी सेलने शासकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया राबविणार नसल्याचा धक्कादायक मेल मंगळवारी (दि.१८) सायंकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी तंत्रशिक्षण संचालक, सहसंचालक आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवला. गुरुवारी (दि.२०) दुपारी १ वाजता पुन्हा मेल पाठवत १८ जूनचा मेल ‘नजरअंदाज’ करण्याची सूचना केली. या मेल ‘कांडा’मुळे सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागातील समन्वयाचा अभावही समोर आला आहे.  

राज्यातील शासकीयसह खाजगी महाविद्यालयातील वैद्यकीय, अभियांत्रिकीसह एकूण ५२ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. मागील तीन दिवसांपासून प्रवेश नोंदणीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे राज्यात गोंधळ उडाला होता. या गोंधळामागे सीईटी सेल आणि तंत्र शिक्षण संचालनालयातील मानापमान नाट्य असून, दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा गोंधळ उडाला.  याविषयी सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही.

१८ जूनच्या मेलमधील मजकूरअभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुशास्त्र, एमबीए, एमसीए आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शासनाकडून व तंत्रशिक्षण संचालनालयाकडून  नियमावली पुस्तिका व मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविणार नाही. याविषयी माहिती मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला अवगत केली आहे. 

२० जूनच्या मेलमधील मजकूर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १८ जून रोजी आलेला मेल ‘नजरअंदाज’ करण्यात यावा. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद