रघुनाथ सावळे
उंडणगाव : दिवसेंदिवस मजुरांचा येत असलेल्या तुटवड्यामुळे शेतकरी आता वैतागून गेले आहेत. यामुळे नाइलाजाने तणनाशकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, याद्वारे शेतातील गवताचा नायनाट केला जात आहे.
सध्या खरीप हंगामाची शेतीकामे भरात असून, पिकांची निंदणी, कोळपणी, फवारणी आदी कामे सुरू आहेत. मृग नक्षत्रापासून मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मात्र, आता रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांची वाढ जोमदार होत आहे. त्यातच दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने आसपासच्या गावांमध्ये पायपीट करावी लागत आहे. त्यात काही शेतकरी जास्तीचा मोबदला देऊन मजुरांना पळवत असल्याने इतरांना अडचणी येत आहेत. यातून नाइलाजाने शेतकऱ्यांनी तणाचा नाश करण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे उत्पन्नात फटका बसणार असला तरीही मजुरांपेक्षा कमी खर्चात काम होत असल्याने शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.
चौकट
...असे वाचतात शेतकऱ्यांचे पैसे
किमान १ एकर शेती निंदणीसाठी दिवसभरात किमान पाच मजूर लागतात. मजुरांचा २०० रुपये प्रतिरोज खर्च पकडला, तर १ हजार रुपये लागतात. त्याच एकरभर शेतात तणनाशकाचा वापर केला, तर चारशे ते पाचशे रुपयांमध्ये काम उरकून जाते. यामुळे परिश्रम व वेळेचीही बचत होते. या तणनाशकांचा मोठ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
कोट.... बाकी
फोटो कॅप्शन : उंडणगाव परिसरातील शेतात तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी.
210721\20210718_152456.jpg
उंडणगाव परिसरातील शेतात तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी.