शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पेट्रोल परवडेना म्हणून घेतला घोडा, ‘जिगर’वर सफर करताना इंधनाची फिकीर सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 11:18 IST

सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपयात काठियावाडी घोडा विकत घेतला आणि आता कामावरच नाही तर शहरात कुठेही जायचे म्हटले तरी ते घोड्यावरच जातात.

- शेख मुनीरऔरंगाबाद : पेट्राेल-डिझेलच्या किमती बेलगाम (Fuel Hike) झाल्या म्हणून काय झाले, ज्याच्या हाती लगाम त्याला कशाची फिकीर? अर्थकारणाचा बारकाईने विचार करून शहरातील एका बहाद्दराने चक्क दुचाकी स्टॅंडवर उभी करून घोड्यावर मांड ठोकली आहे (Lab technician from Aurangabad purchased horse due to petrol price hike). हा सुशिक्षित दररोज आपल्या लाडक्या ‘जिगर’ घोड्यावरून महाविद्यालयात नोकरीला जातो. तेथे मोटारसायकल स्टॅंडवरच आपला घोडा ‘पार्क’ करतो आणि संध्याकाळी ड्यूटी संपवून घोड्यावरूनच घरी परततो ! 

इंधन दरवाढीविरुद्ध राजकीय पक्ष आंदोलने करतात तेव्हा बैलगाडी किंवा घोडे आणून उत्साह दाखवतात; पण प्रत्यक्षात या महागाईला वैतागून घोड्याचा वापर करणारा विरळाच ! शेख युसूफ शेख ताजोद्दीन, वय ५० वर्षे. घर मिटमिट्यात आणि नोकरी हिमायतबागेजवळ एका महाविद्यालयात, सुमारे १५ किलोमीटरवर. युसूफ सांगतात, ‘मी एक लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. आधी इतरांसारखी मोटारसायकलच वापरायचो. पेट्राेलची शंभरी गाठण्याची चिन्हे पाहून पोटात गोळा आला. कुटुंबात पत्नी, तीन मुले, मुलगी. पगारावरच सर्वांचे शिक्षण आणि उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे खर्च कमी करण्याचाच विचार करायचो. आजोबांनी एक घोडा हौसेखातर पाळला होता. त्यामुळे कुटुंबात घोड्याचे महत्त्व माहीत होते. मीदेखील घोडाच वापरण्याचे ठरवले. सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपयात काठियावाडी घोडा विकत घेतला आणि आता कामावरच नाही तर शहरात कुठेही जायचे म्हटले तरी घोड्यावरच जातो.’

गेल्या सहा महिन्यांपासून मी घोडेसवारी करतो. त्यामुळे माझी तब्येतही ठणठणीत राहते, असे ते सांगतात. आता तर त्यांच्या रोजच्या रस्त्यावरील अनेकजण परिचित झाले आहेत. कॉलेजमध्येही विद्यार्थी त्यांना ‘घोडेवाले मामा’ म्हणून ओळखतात. घोडा ४० ते ५० किमी वेगाने धावतो. त्यामुळे दुचाकीच्या तुलनेत कुठेही पोहोचण्यास वेळही फार लागत नाही. लोकांनी वाहतुकीसाठी अशी इमानदार, दमदार, आरोग्यदायी सवारी केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.

निम्मा खर्चबारावीपर्यंत शिक्षण घेतलेले युसूफ या घोड्याच्या चाऱ्यासाठी दररोज ५० रुपये खर्च करतात. मोटारसायकलला लागणाऱ्या पेट्राेलचा खर्च दुप्पट होता आणि दुरुस्तीचा खर्च वेगळाच. घोडा खूप प्रामाणिक, शांत स्वभावाचा प्राणी आहे. कुठेही बांधला तरी तो आसपासच्या लोकांना त्रास कधीच देत नाही. एकदा सकाळी आणि संध्याकाळी चारा-पाणी दिले की बस्स !

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFuel Hikeइंधन दरवाढ