शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नामविस्तार झाला तसा ज्ञानाचा विस्तार व्हावा: ईश्वर नंदपुरे

By योगेश पायघन | Updated: January 14, 2023 19:10 IST

विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यान

औरंगाबाद : ‘समाजसुधारणेच्या धाग्यातून माणूस नावाचे वस्त्र विणता आले पाहिजे. जाती-धर्माच्या भिंती तोडण्याची ताकद केवळ शिक्षणात आहे. अक्षर वाचणाऱ्यांनी माणसे शोधली, वाचली पाहिजेत. बुद्ध बनने सोपे नसले तरी वाचनातून, चांगल्या विचाराने चित्त शुद्ध बनवता येते. नामविस्तार झाला तसा ज्ञानाचा विस्तार, समरस समाज निर्मित झाला पाहिजे. चौकटी तोडण्याचे प्रयत्न करा. कर्तबगार माणसांना वाव द्या. पुतळा बांधल्यावर त्याच्या रक्षणाची जबाबदारी पुतळा उभारणाऱ्यावर असते. तसा विद्यापीठाचा नामविस्तार ज्यांनी केला, करवून घेतला त्यांनी एकत्र येऊन हे विद्यापीठ लाखात एक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,’ असे मत विचारवंत, अभ्यासक डॉ. ईश्वर नंदपुरे यांनी मांडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाच्या नाट्यगृहात शनिवारी ‘नामविस्तार एक दृष्टिकोन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, संचालक डॉ. मुस्तजीब खान यांची मंचावर उपस्थिती होती. नामविस्तार लढा ही परिवर्तनाची सुरुवात असून याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू म्हणाले, बाबासाहेबांना अपेक्षित विद्यापीठ, संशोधन, विद्यार्थीकेंद्रित व्यवस्था करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डाॅ. सुरेश गायकवाड, डाॅ. गणेश मंझा आदींसह प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते. प्रा. पराग हासे यांनी संचालन केले. डॉ. मुस्तजीब खान यांनी आभार मानले.

लोकमत सुवर्ण पदकाने निवृत्ती टकले यांचा सन्मानडाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बॅचलर ऑफ जर्नालिझम या विषयात २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवत्तेत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्याला ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्यातर्फे लोकमत सुवर्ण पदक देण्यात येते. या सुवर्ण पदकाचे मानकरी निवृत्ती टकले ठरले. त्यांना कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. इंग्रजी विषयात कुलपती सुवर्ण पदक, प्राचार्य एस. टी. प्रधान सुवर्ण पदक रूपाली जाधव, एम ए लोकप्रशासन विषयात डाॅ. रमेश अनंत ढोबळे सुवर्ण पदक केतकी पिसोळकर, एमए राज्यशास्त्र विषयात स्मिता कुलकर्णी, बीए इंग्रजी विषयात मानसी रोटे यांना कुलगुरूंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद