शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

शेळकेच्या अंगावर चाकूचे १० घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:25 IST

चहा विक्रेते दत्तात्रय शेळके यांचे स्वरक्षणासाठी प्रयत्न असफल ठरले. त्यांच्या अंगावर चाकूच्या १० खोलवर जखमा असल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना त्वरित अटक करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेत मृताची पत्नी कल्पना, मुलगी निकिता, मुलगा अरिहंत ऊर्फ नमन व नातेवाईकांनी मंगळवारी घाटीत ठिय्या देत आक्रोश केला.

ठळक मुद्देअटक आरोपींची संख्या ४: आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा घाटीत ठिय्या, आक्रोश

औरंगाबाद : चहा विक्रेते दत्तात्रय शेळके यांचे स्वरक्षणासाठी प्रयत्न असफल ठरले. त्यांच्या अंगावर चाकूच्या १० खोलवर जखमा असल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना त्वरित अटक करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेत मृताची पत्नी कल्पना, मुलगी निकिता, मुलगा अरिहंत ऊर्फ नमन व नातेवाईकांनी मंगळवारी घाटीत ठिय्या देत आक्रोश केला. पाणी देण्याच्या क्षुल्लक कारणावरून सोमवारी रिलायन्स मॉलनजीक दत्तात्रय शेळके यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी घाटीत करण्यात आले; परंतु आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत मृताच्या नातेवाईकांनी तेथेच सकाळपासून आंदोलन पुकारले. पोलिसांनी शिर्डीतून सोमेश बरखा रिडलॉन (२२, रा. गांधीनगर) आणि श्याम सुरेश भोजय्या (३०, रा. श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) या दोघांना अटक केल्याची माहिती दिली.खुनातील इतरही मारेकरी सुटणार नाही, तुम्ही तपासात सहकार्य करावे, अशी समजूत सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांनी घातल्याने नातेवाईकांनी दुपारी २ वाजता मृतदेह ताब्यात घेतला.सूत्रांनी सांगितले की, हल्ला झाला तेव्हा शेळके मदतीची याचना करीत होते; परंतु आरोपींच्या हातात चाकू असल्याने कोणी भांडण सोडविण्याची हिंमत केली नाही. हल्ला करून पळणारे आरोपी रविशंकर तायडे, आदिनाथ चव्हाण या दोघांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून कालच ताब्यात घेतले होते. पसार झालेल्या आरोपींनी त्यानंतर पुन्हा घटनास्थळी येथून चहा टपरी तसेच जगन्नाथ शेळके यांच्या पानटपरीची तोडफोड करून अंधारात पळ काढला. यावेळी तेथे उपस्थित राठोड यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे जगन शेळके यांनी फिर्यादीत म्हटले आहे.सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, पाच ते सहा आरोपी असल्याचे फिर्यादी सांगत असून, मृताच्या अंगावर चाकूच्या खोलवर जखमा आहेत. चाकूचे वार हाताने अडविल्याने दत्तात्रयच्या दोन्ही हातांवर जखमा आहेत. त्यात हाताचा अंगठादेखील छाटला गेला असून, चाकू चालविणारे सराईत गुन्हेगार असावेत, असा संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पुंडलिकनगर पोलीस तपासत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी