शहरं
Join us  
Trending Stories
1
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
2
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; इंजिनिअरला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल
3
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
4
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
5
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
6
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
7
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
8
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
9
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
11
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
12
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
13
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
14
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
15
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
16
प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!
17
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
18
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
19
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
20
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:14 IST

सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेलं षडयंत्र असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचा प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तिसऱ्यांदा गुरुवारी दुपारी  १ वाजता सिल्लोड येथील पोलीस ठाण्यात भेट दिली. आतापर्यंत बांगलादेशी लोकांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी करणाऱ्या सोमय्या यांनी आता चक्क सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि त्यांचे कर्मचारी नगरपरिषद कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांचे आरोप उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी फेटाळून लावले आहे.

सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेलं षडयंत्र आहे. त्यात अधिकारी कर्मचाऱ्यानी संगनमत केले. ४०६ लोकांना केवळ आधारकार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यापूर्वी  सिल्लोड शहरातील केवळ ३ लोकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात वरील ४०६ लोकांसहित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सहआरोपी करा, अशी तक्रार किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांना गुरुवारी दुपारी दिली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे सुरेश बनकर,माजी  आमदार सांडू पाटील लोखंडे, कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर,  शहर अध्यक्ष कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू सहित अनेक भाजपचे पदाधिकारी हजर होते.

दोषी आढळल्यास कठोर कारवाई करूया पूर्वी खोटे कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तीन लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या गुन्ह्यात सोमय्या याच्या तक्रारीचा समावेश करण्यात आला आहे.आता वरील लोकांचे कागदपत्रे तपासून संबंधीत अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर चौकशीत दोषी आढळले तर त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल.-शेषराव उदार पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर.

एकाही बांग्लादेशीला व्यक्तीला जन्म प्रमाणपत्र दिले नाहीज्या ४०६ लोकांविरुद्ध सोमय्या यांनी तक्रार केली होती त्याची तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व नेमलेल्या पथक मार्फत चौकशी करण्यात आली आहे.त्यां नागिरकांचे  स्थानिक रहिवाशी असल्याचे पुरावे आढळले आहे.आम्ही एकही बांगलादेशी नागरिकाला जन्म प्रमाणपत्र दिले नाही तसा अहवाल आम्ही जिल्हाधिकारी यांना  दोन दिवसां पूर्वी दिला आहे कुणी बांगलादेशी आढळलाच नाही तर आम्ही खोटे गुन्हे कसे दाखल करणार ४०६ लोकांविरुद्ध  गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे तसे केले नाही म्हणून माझ्यावर खोटे आरोप होत आहे.- लतीफ पठाण उपविभागीय दंडाधिकारी सिल्लोड.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर