शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
3
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
4
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
5
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
6
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
7
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
8
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
9
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयातील कर्मचाºयांना किरण गणोरे करायचा ‘ब्लॅकमेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:47 IST

सातारा परिसरातील छत्रपतीनगरातील बँक व्यवस्थापकाच्या खून प्रकरणात अटक झालेला किरण गणोरे हा घाटी रुग्णालय अभ्यागत समिती सदस्यत्वाचा गैरफायदा घेत कर्मचाºयांना ब्लॅकमेल करीत असल्याचे समजते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा परिसरातील छत्रपतीनगरातील बँक व्यवस्थापकाच्या खून प्रकरणात अटक झालेला किरण गणोरे हा घाटी रुग्णालय अभ्यागत समिती सदस्यत्वाचा गैरफायदा घेत कर्मचाºयांना ब्लॅकमेल करीत असल्याचे समजते. अनेकांना धमकावून त्याने पैसे उकळले. अटकेमुळे अखेर त्याच्या जाचातून सुटल्याचा नि:श्वास सोडत सोमवारी (दि. ११) घाटीत अनेक कर्मचाºयांनी आनंदोत्सव साजरा केला.घाटी रुग्णालयात सोमवारी दिवसभर किरण गणोरे अटकेची चर्चा रंगली होती. अभ्यागत समितीमध्ये २०१६ मध्ये किरण गणोरे यास सदस्यत्व मिळाले. ही समिती रुग्णालयातील रुग्णसेवा, येथील प्रश्न दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. दोन ते तीन महिन्यांत होणाºया बैठकीत विविध विषयांवर चर्चा होते. समितीच्या सदस्यांना स्वत:च्या सूचना, अभिप्राय रुग्णालयाच्या कर्मचाºयांना परस्पर न कळविता अधिष्ठाता अथवा वैद्यकीय अधीक्षकांना कळविणे आवश्यक आहे. तसेच सदस्यांना एखाद्या कक्षास भेट द्यावयाची असल्यास प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा प्रभारी परिचारिकांची उपस्थिती आवश्यक असते; परंतु किरण गणोरे यास फाटा देत स्वत:ची मनमानी करीत होता,असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. अभ्यागत समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित क रू, असे धमकावत घाटीतील अनेक वॉर्डात, विभागातील कर्मचाºयांना गणोरे त्रास देत होता. बैठकीत सदस्यांचेच ऐकले जाते, कर्मचाºयांची कोणतीही बाजू ऐकून न घेता चौकशीचा फेरा लावला जातो. त्यामुळे त्याचा त्रास निमूटपणे सहन करावा लागत होता, असे कर्मचाºयांनी म्हटले. घाटीतील निवासस्थान मिळावे म्हणून कर्मचाºयांवर दबाव आणत होता. घाटीत फिरणाºया खाजगी लॅबच्या लोकांकडून पैसे उकळत होता, असेही काहींनी सांगितले. खून प्रक रणात गणोरे अटक झाल्याने त्याच्या त्रासातून सुटल्याची भावना अनेक कर्मचाºयांनी व्यक्त केली.