शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

7 कोटींच्या गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 13:54 IST

शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम औरंगाबाद शहराला पाच रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.

ठळक मुद्देव्यापारी, फेरीवाले, हातगाड्यांमुळे वाहतुकीचा होतो खोळंबामहापालिकेने या रस्त्यावर किमान आठ ते दहा वेळेस कारवाई केली. 

औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर चौकापासून पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीपर्यंत महापालिकेने तब्बल सात कोटी रुपये खर्च करून गुळगुळीत सिमेंट रस्ता तयार केला. या रस्त्याचा वापर फक्त आणि फक्त वाहनधारकांनी करायला हवा. मात्र, असे होताना दिसून येत नाही. व्यापाऱ्यांनी फूटपाथ तर सोडा सिमेंट रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले. सिमेंट रस्त्यावर फेरीवाले आणि हात गाड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम औरंगाबाद शहराला पाच रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर चौकापर्यंतचा २४ मीटर रुंद रस्ता तयार करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून या भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. दरवर्षी डांबरी रस्ता उघडत होता. पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचा वापर परिसरातील नागरिकांनी करायला `हवा. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंदीचा गुळगुळीत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावरून चारचाकी वाहन नेताना बराच त्रास होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा नाइलाज असतो. त्यांना आपले वाहन सिमेंट रस्त्यावर उभे करावे लागते. महापालिकेने या रस्त्यावर किमान आठ ते दहा वेळेस कारवाई केली. सकाळी कारवाई झाल्यानंतर सायंकाळी अतिक्रमण जशास तसे राहते. आता तर महापालिका या समस्येकडे लक्षही द्यायला तयार नाही. वाहतूक पोलिसांनाही अनेकदा या ठिकाणी कारवाई केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही. 

व्यापाऱ्यांची अतिक्रमणे दहा ते बारा फुटांपर्यंतरस्त्यापासून बऱ्याच अंतरावर व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. व्यापाऱ्यांनी स्पर्धेसाठी दुकानासमोर आठ ते दहा फूट अंतरापर्यंत अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांसमोर फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे अठराशे मीटर लांबीच्या रस्त्यावर वाहनधारकांना कुठे आठ फूट, तर कुठे दहा फूट जागा वाहन चालविण्यासाठी शिल्लक राहते.

पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर चौक१.८ कि.मी. रस्त्याची लांबी२४ मीटर रस्त्याची रुंदी  ७ कोटी रुपये एकूण खर्च

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा