शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

भिन्न रक्तगट असूनही किडनी प्रत्यारोपण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:05 IST

जुळत्या रक्तगटाच्या नातेवाईकांची किडनी रुग्णास प्रत्यारोपित करणे, ही एक नियमित बाब आहे. परंतु दात्याचा रक्तगट रुग्णाशी जुळत नसतानाही विशिष्ट उपचार पद्धतीने दुर्मिळ अशी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाड्यात पहिलेच प्रत्यारोपण : युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया

औरंगाबाद : जुळत्या रक्तगटाच्या नातेवाईकांची किडनी रुग्णास प्रत्यारोपित करणे, ही एक नियमित बाब आहे. परंतु दात्याचा रक्तगट रुग्णाशी जुळत नसतानाही विशिष्ट उपचार पद्धतीने दुर्मिळ अशी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली.मधुमेह व किडनीविकार जडलेला ५८ वर्षीय रुग्ण गेल्या कित्येक दिवसांपासून डायलिसिसचा उपचार घेत होता. रुग्णाची पत्नी ही एकमेव किडनी दाता म्हणून उपलब्ध होती. परंतु रुग्णाचा रक्तगट ‘ओ ’ आणि दात्याचा रक्तगट ‘बी’ असल्याने प्रत्यारोपण शक्य नव्हते. परंतु सिग्मा हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी उपलब्ध दात्याची किडनी प्रत्यारोपण करण्याचे आव्हान स्वीकारले.प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ९ एप्रिल रोजी यशस्वीपणे पूर्ण झाली. रक्तगट जुळत नसताना केलेले मराठवाड्यातील हे पहिलेच किडनी प्रत्यारोपण ठरले आहे. या शस्त्रक्रियेतून मराठवाड्याच्या प्रत्यारोपणाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाईल, असे डॉ. मनीषा टाकळकर आणि डॉ. उन्मेष टाकळकर यांनी म्हटले. अशा प्रकारच्या प्रत्यारोपणामुळे कित्येक किडनी रुग्णांना एक नवसंजीवनी प्राप्त होईल, असे मत किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी व डॉ. श्रीगणेश बरनेला यांनी व्यक्त केले.शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरांचे पथकशहरामध्ये पहिले अवयवदान व प्रत्यारोपण सिग्मा हॉस्पिटलमध्ये झाले. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात अवयवदानाची चळवळ वाढली. किडनी प्रत्यारोपणाची ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकात डॉ. अभय महाजन, डॉ.अरुण चिंचोले, डॉ. श्रीगणेश बरनेला, डॉ.सचिन सोनी, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. अजय रोटे यांचा सहभाग होता.

टॅग्स :docterडॉक्टरHealthआरोग्य