शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या व्यवहारातून हॉटेलचालकाचे अपहरण; रात्रभर जागून पोलिसांनी बीडमधून केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 17:01 IST

पोलिसांनी दोन अपहरणकर्त्यांना अटक केली. 

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने रक्कम परत करता आली नव्हती. पोलिसांनी आरोपींच्या निवासस्स्थानाभोवती सापळा रचला.

औरंगाबाद : पैशाच्या व्यवहारातून अपहरण झालेल्या हॉटेलचालकाची सिटीचौक पोलिसांनी बीड येथून मोठ्या शिताफीने सुटका केली.  पोलिसांनी दोन अपहरणकर्त्यांना अटक केली.  सुरेश गिराम आणि राजाभाऊ सोळुंके (रा. बीड), अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

विकास वशिष्ठ फरताळे (२७, रा. शिवाजीनगर), असे  सुटका झालेल्या हॉटेलचालकाचे नाव आहे. विकासने आरोपी गिरामकडून ३ लाख रुपये तेल कारखाना सुरू करण्यासाठी घेतले होते. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने विकासला  रक्कम परत करता आली नव्हती. गिराम यांनी पैसे मागितल्यानंतर विकास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. यामुळे गिराम, सोळुंके आणि अन्य तीन लोकांनी विकासचे मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून अपहरण केले होते.  ही माहिती समजताच त्याच्या वडिलांनी  सिटीचौक ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली होती. तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, कर्मचारी अप्पासाहेब देशमुख, संजय नंद, शेख गफ्फार, देशराज मोरे आणि दत्ता बडे यांच्या पथकाने रात्रीच बीड गाठून आरोपींचा शोध सुरू केला. 

पोलिसांनी आरोपींच्या निवासस्स्थानाभोवती सापळा रचला. प्रकारातील संशयित आरोपी बीड येथील त्याच्या घरीच होते. तर अन्य आरोपी बीड शहरात आले नव्हते. यामुळे पोलीस घराबाहेर नजर ठेवून होते. रात्रभर पोलीस या घरावर पाळत ठेऊन होते. बुधवारी पहाटे आरोपींनी  विकासला घेऊन बीडमध्ये प्रवेश केला. तेव्हा केवळ सुरेश गिराम आणि राजाभाऊ सोळुंके  आणि विकास जीपमध्ये होते. पोलिसांनी तत्काळत्यांच्या त्यांच्यावर झडप घेत अगोगर त्यांच्या तावडीतून विकासची सुटका केली.  आरोपींना ताब्यात घेतले.  विकाससह आरोपींना घेऊन पोलीस सकाळी शहरात परतले.  आरोपींनी गुरूवारी न्यायालयात हजर केले जाईल. 

रात्रभर विकासला घेऊन फिरले आरोपीआरोपींनी औरंगाबादेतून  विकासला उचलल्यानंतर ते जालना, मंठा, आष्टीमार्गे बुधवारी सकाळी बीड शहरात गेले. रात्री एका ढाब्यावर त्यांनी एकत्र जेवण केले, असे सूत्राने सांगितले.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद