शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत ठेकेदाराचे अपहरण; मारहाण करून तिघांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 14:32 IST

Crime News Aurangabad दोघांनी ठेकेदारास लिंक रोड चौफुलीवरील उड्डाणपुलाजवळ नेऊन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देवाळूज महानगर येथील आठवडाभरापूर्वीची घटनारोख १५ हजार, दुचाकी व मोबाइल लांबविला

वाळूज महानगर : कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे आठवडाभरापूर्वी तिघांनी अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करीत लुटल्याची घटना नुकतीच उद्योगनगरीत उघडकीस आली. या लुटमारीत ठेकेदाराची दुचाकी, रोख १५ हजार व मोबाइल घेऊन गुंड पसार झाले.

भाऊसाहेब चंद्रकांत काळे (४०, रा. वाडीनांदर, ता. पैठण, ह.मु. रांजणगाव) हे उद्योगनगरीतील कारखान्यात कंत्राटी कामगार पुरवितात. १९ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दत्तनगर फाट्यावर मद्य प्राशन करून ते दुचाकीवरून (एमएच-२०, एफसी-५९१८) रांजणगाव फाट्यावर गेले होते. तीन गुंडांनी त्यांची दुचाकी थांबवून आमच्या दुचाकीत पेट्रोल टाका असे सांगितले. दोघांनी काळे यांना बळजबरीने दुचाकीवर बसवले व ते बजाजनगरच्या दिशेने निघून गेले. त्यांचा एक साथीदार काळे यांच्या दुचाकीजवळ पहारा देण्यासाठी थांबला होता.

मारहाण करून १५ हजार व मोबाइल लांबविलाया दोघांनी काळे यांना लिंक रोड चौफुलीवरील उड्डाणपुलाजवळ नेऊन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काळे यांच्या खिशातील रोख १५ हजार रुपये व २ हजार रुपयांचा मोबाइल बळजबरीने काढून ते दुचाकीवरून फरार झाले. यानंतर ते पायी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकी आणण्यासाठी रांजणगाव फाट्यावर आले. तेथे तो आरोपी व दुचाकीही नव्हती. काळे यांनी गुरुवारी (दि.३१) तक्रार दिली. उपनिरीक्षक चेतन ओगले हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसी