शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंचा पराभव शिवसेनेच्या आमदारांमुळे झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:54 IST

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवसेनेच्याच आमदारांनी केला आहे. शिवसेनेकडून आमदार राहिलेले हर्षवर्धन ...

ठळक मुद्देमहसूलमंत्र्यांचे स्पष्टीकरण : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप प्रत्येकी १३५ जागांवर लढेल

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवसेनेच्याच आमदारांनी केला आहे. शिवसेनेकडून आमदार राहिलेले हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिले. खा.खैरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व शहरातील भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर अपक्ष उमेदवार जाधव यांचे काम केल्याचा आरोप केला होता. त्यावर आज महसूलमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत जाधव हे शिवसेनेचे आमदार होते, त्यांच्यामुळेच खैरेंचा पराभव झाल्याचे स्पष्ट केले.मराठवाड्यातील दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेण्यासाठी ते रविवारी औरंगाबादेत आले होते. सकाळी विभागीय आयुक्तालयात व दुपारी आयएमए हॉलमधील चर्चासत्राला त्यांनी हजेरी लावली. आयएमए हॉलमधील चर्चासत्रानंतर महसूलमंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले, आगामी विधानसभेसाठी भाजप-शिवसेना यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. भाजप १३५ व शिवसेना १३५ जागांवर लढेल. विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत पाटील म्हणाले, भाजप-शिवसेना विधानसभेत युती करूनच लढेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. २८८ पैकी २७० जागांवर युती लढेल. १८ जागा या युतीसोबत असलेल्या मित्रपक्षांना सोडण्यात येतील.जागा वाटपात बदल नाहीपूर्वी ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी १३५ जागांवर आपले उमेदवार उभे करील. तेवढ्याच जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढतील. त्यामुळे युतीच्या या जागा वाटपात काही बदल होणार नाहीत. एकत्रितपणे विधानसभेलाही शिवसेना-भाजप व मित्रपक्ष सामोरे जातील, असा दावा पाटील यांनी केला.-------------

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा