शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

करुणा शर्मा प्रकरण : अरुण मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 19:57 IST

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अरुणला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

अंबाजोगाई : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अपर सत्र न्यायालयाने अरूण दत्तात्रय मोरे यास सोमवारी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यास मंगळवारी (दि.०७) न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. याच प्रकरणात सोमवारी करुणा अशोक शर्मा यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

रविवारी (दि.०५) परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा शर्मा आणि अरूण दत्तात्रय मोरे (दोन्ही रा. मुंबई) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह ॲट्राॅसिटीसारख्या गंभीर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले होते. सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अरुणला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने अधिक तपास करण्यासाठी चार दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने अरुण मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी बीडच्या जिल्हा कारागृहात करण्यात आली. या प्रकरणात फिर्यादीतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी तर आरोपीच्या वतीने ॲड. श्रीकांत गलांडे यांनी काम पहिले. दरम्यान, दोन्ही आरोपींच्या वतीने बुधवारी जामीनासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड