औरंगाबाद : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पळशी रोडवरील पारदेश्वर मंदिर परिसरात भरणारी कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली आहे. यामुळे सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी भाविकांना भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येणार नाही. पारदेश्वर मंदिरात भगवान कार्तिकची मूर्ती विराजमान आहे. कार्तिकी पौर्णिमेला येथे यात्रा भरत असते. मंदिरात नित्यनियमाने पूजा, आरती सुरू आहे, पण भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांनी येऊ नये, असे आवाहन आनंदगिरी महाराज यांनी केले आहे.
कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द
By | Updated: November 29, 2020 04:04 IST